जत | 2019 चे आमदार विलासराव जगतापच ; खा.संजय पाटील |

0

कृष्णा खोरे महामंडळच्या उपाध्यक्ष झाल्याबद्दल जतेत नागरी सत्कार

जत,वार्ताहर:भाजपचा पुढचा उमेदवार विद्यमान आमदार विलासराव जगतापच असतील, ते गत पाच वर्षातील विकास कामाच्या जोरावर पुन्हा विजयी होतिल असे सांगत खा.संजय पाटील यांनी जत तालुक्यातील भाजपकडून आमदारकी लढविण्याच्या शर्यतीत असलेल्या अनेक नेत्यांच्या मनसुब्यांना तुर्त ब्रेंक लावला.तालुक्यात आ.विलासराव जगताप यांनी रस्ते,सिंचन योजना,सह आमदार,जिल्हा नियोजनमधून विकास कामाचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे जनता यावेळी त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करेल, जत तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यत म्हैशाळचे पाणी पोहचविण्यासाठी कठिबध्दं आहोत.पाण्यासाठी प्रंसगी खासदारकी पणाला लावू असे प्रतिपादन खा.संजय पाटील यांनी केले.
ते जत येथे खा.पाटील यांची कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात बोलत होते.
  यावेळी खासदार संजय पाटील यांचा पंचायत समिती जत व भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी भाजप नेते डॉ.रविंद्र आरळी,शिक्षण व आरोग्य समिती सभापती तम्मणगौडा रविपाटील,पंचायत समिती सभापती सौ.मंगल जमदाडे,जि.प.सदस्य सरदार पाटील ,  प्रभाकर जाधव,शिवाप्पा तांवशी,माजी सभापती आर.के.पाटील,रामण्णा जिवाण्णावर,आप्पासो नामद,जत पश्चिम भागाचे नेते परशूराम चव्हाण सर आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार संजय काका पाटील म्हणाले कि,खासदारकी व कृष्णा खोरे महामंडळच्या उपाध्यक्ष पद जत तालुक्याच्या पाणी प्रश्नाकरिता पणाला लावून जतच्या शेवटच्या टोकापर्यत म्हैशाळचे पाणी पोहचविण्यासाठी मी कठिबध्दं आहे.जनतेचा विकास करायचा असेलतर शेतीला पाणी व औद्योगिकरण वाढले पाहिजे,सर्वसामान्याचा हाताला काम मिळावे याकरिता रोजगार उपलब्धं होईल असे उद्योग यापुढे उभारण्यासाठी प्रयत्न करत आहे.तालुक्यातील म्हैसाळ योजनाची कॅनाल व अस्तीरकरणची  कामे येत्या चार माहिन्यात पूर्ण होतील.
म्हैसाळ योजनेपासून वंचित 42 गावच्या पाणी प्रश्नासाठी कर्नाटकाचे विद्यमान मंत्री शिवकुमार यांच्याशी चर्चा केलेली आहे.याकरिता लवकरच बैठक घेणार आहोत.महाराष्ट्र सरकार कर्नाटकला देत असलेल्या पाण्याच्या मोबदल्यात जत मधील सिमावर्ती 42 गावांना तुरची-बबलेश्वर योजनेतून पाणी देणेकरिता आग्रही आहोत. या संदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन  यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर 75 गावच्या पाणी पुरवठा  योजनेकरिता पाठपुरावा अंतिम टप्पात आहे.विविध योजनेतून कोट्यावधीचा निधी आणून तालुक्याचा  विकासाचा व जलसिंचनाचा मोठा बॅकलाॅग भरुन काढण्याचा प्रयत्न केलेला आहे.सातत्याने पाठपुरावा करुन म्हैसाळ योजनाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश केलेला आहे यामूळे या योजनेस गती मिळाली आहे. बरेच वर्षे रंगाळलेल्या म्हैसाळ योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता देणेचे काम केले आहे.यामूळेच या योजनेचे कामे युध्दपातळीवर सुरू आहेत.अंकले व खलाटी पंप हाऊसचे काम झाल्याशिवाय पुढील काम करता येत नव्हते ते अतिंम टप्यात आले आहे.रस्ताच्या कामास विविध योजनेतून मोठा निधी दिलेला आहे.नॅशनल हायवेची कामे तालुक्यात मोठ्या प्रमाणात चालू केलेली आहेत.
           मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिलेली जबाबदारी मोठी आसून त्या संधीचे सोने करण्यासाठी माझा प्रयत्न राहील.कृष्णा खोरे महामंडळ अंतर्गत 72 तालूके 8 जिल्हात जलसिंचन कामाकरिता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यावर माझा भर राहिल असे शेवटी खा.पाटील म्हणाले, यावेळी आमदार विलासराव जगताप म्हणाले कि,जत तालुक्याच्या दृष्टीने म्हैसाळ योजना पूर्ण करणे,तालुका विभाजन ,विजेचा प्रश्न ,रस्ताचा प्रश्न मोठ्या प्रमाणात होते.त्यांची पूर्तता केली जात आहे.वाळेखिंडी,नवाळवाडी ,बेवनूर या गावाकरिता टेंभू योजनेतून पाणी देण्याकरिता प्रयत्नशील आहे.म्हैसाळ योजनेतून वंचित असलेल्या आठ गावे समावेश करण्याकरिता अधीक्षक अंभियंता यानां याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.दोड्डानाला प्रकल्पात पाणी सोडल्यास अनेक गावांचा प्रश्न सुटणार आहे.नॅशनल हायवेची कामे प्रगतीपथावर आहेत.विजेचा प्रश्नाकरिता दोन शेतकरी करिता त्याच क्षमतेचा एक टी.सी.देण्यास आॅगस्ट महिन्यात सुरूवात होईल.यामूळे वीज गळती व चोरी रोखली जाईल यांचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
स्वागत व प्रास्ताविक सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी केले व प्रस्ताविकेतून म्हैसाळ सिंचन योजनासह प्रलंबित प्रश्न सोडविणेची मागणी केली.कार्यक्रमाकरिता तालुक्यातील सर्व गावातील भाजप नेते, सरपंच,सोसायटीचे चेअरमन व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खा. संजय पाटील जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन :
जनतेच्या विविध कामाची सोय व्हावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुलातील गाळ्यात हे कार्यालय सुरु करण्यात आले आहे.त्यांचे उद्घाटन खा.पाटील यांच्या हस्ते झाले.त्याशिवाय खलाटी ता.जत येथील बंधाऱ्यांचे उद्घाटन खा. पाटील यांच्या करण्यात आले.

Rate Card

जत : कृष्णा खोरे महामंडळच्या खा. संजय पाटील यांची उपाध्यक्ष झाल्याबद्दल त्यांचा जतेत भव्य नागरी सत्कार करताना आमदार विलासराव जगताप,भाजप नेते डॉ.रविंद्र आरळी प्रकाश जमदाडे इतर मान्यवर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.