जत | उमदी मटका अड्ड्यावर छापा : 10 लाखाचा मुद्देमाल जप्त |

0
9

जत,प्रतिनिधी: उमदी ता.जत येथे  सुरू असलेला बेकायदा मटका अड्ड्यावर छापा टाकून 9 लाख 92 हाजार 454 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. तर सहा संशियतांना ताब्यात घेतले आहे. सा.पोलिस निरिक्षक संतोष डोके यांच्या पथकाने हा छापा टाकला.
पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी, उमदी येथील धोंडाप्पा परगोंड यांचे भाड्याने खोलीत मटका बुकी राजेंद्र शिंदे रा.उमदी हा मटका घेत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.त्याआधारे हा छापा टाकला असता  6 जुगाऱ्यांना पुकडेल तर त्याच्यांकडून मटक्याच्या चिठ्ठ्या,8 मोबाईल,6 कँल्क्युलेटर,12 पेन,6 पँड,1 प्रिंटर,रोख 4,670 रुपये,1 मोटार सायकल,1 स्विप्ट डिझायर कार असा एकूण 9 लाख 92 हाजार 454 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. राजेंद्र शिंदे,राजकुमार साळे,मलगोंडा गिलकी तिघे रा.उमदी, प्रकाश किट्टग रा.जाड्डरबोबलाद,रणजिंत छलवादी रा.भिवर्गी यांना ताब्यात घेतले आहे.
जिल्हा पोलिस प्रमुखाच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.पोलिस निरिक्षक संतोष डोके, दिपक ठोंबरे, अरूण पाटील, मुद्दसर पाथरवट,सोहेल कार्तियनी,सचिन जाधव,वनिता चव्हाण यांचा पथकात समावेश होता.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here