तालुक्यातील वाड्यावस्त्याना डांबरीकरण रस्त्यांनी जोडणार आ.विलासराव जगताप ; बाज-माधवनगरवाडी रस्ता डांबरीकरण कामाचे उद्घाटन

0
5

डफळापूर, वार्ताहर: जत तालुक्यातील प्रत्येक गावातील वाड्यावस्त्यांना जोडणारे रस्ते डांबरीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.असे प्रतिपादन आ.विलासराव जगताप यांनी केले. राज्य,केंद्र,शासनाच्या विविध योजनातून जत तालुक्यातील नागरिकांची पुढील काही वर्षात खड्डेमय रस्त्यातून पुर्णत: मुक्तता करण्यासाठी निधी उपलब्धं होत आहे.पुढील काळात जत तालुक्यातील सर्व रस्ते करण्याचा संकल्प आ.जगताप यांनी बोलून दाखविला.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बाज- माधवनगरवाडी रस्ता कामाचे उद्घाटन आमदार विलासराव जगताप यांचे हस्ते करण्यात झाले.या रस्त्यासाठी आमदार विलासराव जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे एम.एम.जी.एस.वाय.मधून 2 कोटी 6 लाखाचा निधी उपलब्धं झाला आहे. बाज गावचा भाग असल्याने माधवनगर वाडीला जाण्यासाठी डांबरीकरणाची मागणी होत होती. या रस्त्याला निधी मिळवून दिल्याबद्दल बाज ग्रामस्थांच्या वतीने आमदार जगताप यांचा ग्रामस्थांच्या वतीने संजय गडदे यांनी आमदार जगताप यांचा नागरी सत्कार केला. उद्घाटनानंतर आमदार विलासराव जगताप यांनी लोकाशी संवाद साधला.अडीअडचणी जाणून घेतल्या.लवकरच बाज- कोकळे-विजयनगरवाडी  मार्गे)रस्त्यासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले. संबधित कामाचा ठेकेदार नजिकच्या गावचा सरपंच असेलने काम चांगले करुन घ्या असा सल्ला ही माधवनगरवाडी ग्रामस्थांना द्यायला आमदार जगताप विसरले नाहीत. या कार्यक्रमासाठी माजी सभापती प्रकाशराव जमदाडे, डफळापूरचे परशराम चव्हाण सर,बालाजी सुतार,आप्पासाहेब तेली,अंकलेचे शंकर वगरे,राजु चौगुले, शिंगणापूरचे सरपंच आण्णाप्पा पांढरे, उपसरपंच संदीप पाटील, बाजच्या सरपंच कमल गडदे, संजय गडदे,अरविंद गडदे,तम्माण्णा गडदे सर, शिवाजीराव गडदे, उपसरपंच प्रभू खरात,ग्रा.प.सदस्य संजय गडदे, प्रल्हाद गडदे जे.ई. शिंदे उपस्थित होते.

डफळापूर : बाज-माधवनगरवाडी रस्ता डांबरीकरण कामाचे उद्घाटन आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी सभापती प्रकाश जमदाडे, परशूराम चव्हाण सर आप्पासाहेब तेली उपस्थित होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here