जत | महिलेस धक्काबुकी करून अडीच लाखाचे दागिणे लंपास जतेत भर लोकवस्तीतील प्रकार |

0

वडपुजेसाठी जाताना चोरट्यानीं दागिणे हिसडा देऊन पळविले

Rate Card

जत,प्रतिनिधी;वट पोर्णिमेनिमित्त वड पुजेसाठी निघालेल्या एका महिलेच्या गळ्यातील दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सात तोळ्यांचे दागिणे धक्काबुकी करून हिसडा देऊन लंपास केले.बाजारभावानुसार त्यांची किंमत सुमारे अडीच लाख रुपये आहे.जत शहरातील मध्यवर्ती भागात,पोलिस ठाण्याच्या नजिक हा प्रकार घडल्याने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.बुधवारी दुपारी हा प्रकार घडला.
उमा विष्णूपंत साळे (रा.मंगळवार पेठ,जत)असे दागिणे चोरीस गेलेल्या विवाहितेचे नाव आहे. उमा साळे यांचे पती विष्णूपंत यांचे मंगळवार पेठेत इलेक्ट्रॉनिकचे दुकान आहे.दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर ते राहतात.विष्णूपंताचे एक भाऊ विद्यानगरमध्ये राहतात.त्यांमुळे उमा साळे ह्या जाऊबाईसोबत त्या प्रांत कार्यालय परिसरात असलेल्या वडाची पुजा करण्यासाठी जात होत्या.महसूल कॉलनीतील आर.आर.कॉम्प्युटर जवळ मोटारसायकली वरून आलेल्या दोन तरूणांपैंकी एकाने उमा यांना धक्काबुकी केली. दुसऱ्यांने  धुमस्टाईलने त्यांच्या गळ्यातील दागिन्यांना हिसडा मारला.काही कळायच्या आत चोरट्यानीं मोटारसायकलीवरून धुम ठोकली.ते विद्यानगरच्या दिशेने वेगात निघून गेले.पाच तोळ्याचे मंगळसुत्र,व दोन तोळ्याचा राणीहार,असा अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरट्यानीं लंपास केला.
चोरटे मोटारसायकली वरून आले होते.दोघांनी तोंडास रुमाल बांधले होते.एकाच्या अंगात करड्या तर दुसऱ्याच्या अंगात निळ्या रंगाचा टी.शर्ट होता.युनिकार्न मोटार सायकलीचा त्यांनी चोरीसाठी वापर केला.दागिणे चोरीस गेल्या नंतर उमा व त्यांच्या सोबत असलेल्या महिलांनी आरडाओरडा केला.मात्र चोरटे अतिशय वेगाने निघून गेले.जत शहरासह तालुकाभर चोऱ्यांच्या घटना वाढल्या आहेत.काही ठिकाणचे चोरटे पकडूनही कोणत्याही चोरीचा छडा लागला नाही.नेमके पोलिस काय करतात.असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. चोरट्यांना जरब बसत नसल्याने आता शहरातील लोकवस्तीत दिवसाढवळ्या चोऱ्यां होत आहेत. बुधवारी झालेली चोरीमुळे महिलाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर येत आहे.शहरातील मध्यवर्ती प्रांत कार्यालय, पोलिस ठाणे, व महसूल कॉलनी असलेल्या परिसरात ही घटना घडली आहे.दिवसाढवळ्या चोरचा प्रकार घडल्याने खळबंळ उडाली आहे. दरम्यान चोरीच्या चर्चेने महिलात भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबतचा गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.