अंकलगी, वार्ताहर: अंकलगी ता.जत येथे बेकायदेशीर सुरू असलेली दारू विक्री बंद करावी अशी मागणी ग्रामस्थांची आहे.
तीन हाजार वर लोकसंख्या असलेल्या अंकलगीत दारू बंदीची ग्रामपंचायत कडून मागणी करण्यात आली आहे.तरीही दारू विक्री कायम आहे. याला पाठिशी घालणारी यंत्रणेचा शोध घेऊन गावातील पुर्ण दारू विक्री बंद करावी अशी मागणी संरपच शिवनिंगाप्पा तेली यांनीही केली आहे. दारू विक्रीमुळे युवा वर्ग आहारी जात आहे. त्याशिवाय अनेक मद्यपी दारूचे सेवन करुन दांगडधिंगा करतात.त्यामुळे कायदासुव्यस्था प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे सामान्य ग्रामस्थांना त्रास होत आहे. त्यामुळे उमदी पोलिस ठाण्याचे कृतृत्वदक्ष सा.पोलिस निरिक्षक भगवान शिंदे यांनी लक्ष घालून दारू बंद करावी अशी मागणी होत आहे.





