जत | ग्रामस्थांच्या जागृत्तीमुळे चोरट्यांना धास्ती |

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात वाढलेल्या चोरीच्या घटनामुळे वैतागलेल्या ग्रामस्थांकडून स्वता:च दक्षता घेण्यात येत आहे.चोरीच्या वाढत्या घटना रोकण्यासाठी अनेक गावात ग्रामसुरक्षा दल स्थापण्यात आले आहे. त्याशिवाय नागरिंक ही सतर्कता बाळगत आहेत.त्यामुळे जत शहर,व खैराव या दोन्ही घटनेत सहा दरोडेखोरांना रंगेहाथ पकडून चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यामुळे काही प्रमाणात चोरींना आळा बसेल असे चित्र आहे.
चोरीच्या घटनेने पोलिस दप्तरी नोंद होते खरे पंरतू पोलिसांचे कायद्याने बांधलेले हात यामुळे चोरीच्या घटनेचा तपास म्हणावा तसा लागत नव्हता,परिणामी दिवसेदिंवस चोरीच्या घटना वाढीस लागल्या होत्या.अनेक घरे,दुकाने फोडून लाखोचा मुद्देमाल पळविला जात होत.अगदी प्राथमिक शाळा फोडून मध्यान्ह भोजनाचे साहित्य, गँस,शेगड्या पळविण्यापर्यत चोरट्यांची मजल गेली आहे.आम्हाला काहीही होऊ शकत नाही या भावनेने चोरटे सुसाट झाले होते. मात्र चार दिवसापुर्वी शहरातील निगडी कॉर्नर येथील संकपाळ यांच्या किराणा दुकानात चोरी करताना प्रंसगावधान राखत नागरिकांना गोळा केल्याने तीन दरोडेखोरांना पकडण्यात यश मिळाले होते.एवढे होऊनही चोरट्यानीं पुन्हा खैराव येथे दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला तेथेही दरोडा टाकण्याचा प्रयत्नातील दरोडेखोरांना जमलेल्या जमावाकडून सिनेस्टाईल पाठलाग करून पकडून चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यामुळे भविष्यात चोरट्यांची खैर नसल्याचा संदेश या दोन घटनेतून दिला आहे.

Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.