डफळापूर | मोरया सुपर बाजार अज्ञात चोरट्यानीं फोडून 61 हाजार पाचशे रूपयाचा मुद्देमाल लंपास |

0
13

जत,प्रतिनिधी: डफळापूर ता.जत येथील मोरया सुपर बाजार हे किराणा दुकान अज्ञात चोरट्यानीं फोडून 61 हाजार पाचशे रूपयाचा मुद्देमाल लंपास केला. घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी, जत-सांगली रोडवर अर्जून पाटील (रा.बाज)यांच्या मालकीचे मोरया सुपर बाजार हे दुकान आहे. शुक्रवारी मध्यरात्री दुकानच्या पाठीमागील दरवाज्याचे कडीकोंयडा तोडून चोरट्यानीं आत प्रवेश केला.त्याच बाजूने दुकानातील तेलाचे कँन,बॅगाचे बॉक्स,तांदळाची पोती,साडेतीन हाजार चिल्लर,व किराणा साहित्य असे 61हाजार पाचशे रूपयाचा मुद्देमाल लंपास केला. अधिक तपास पो. हे.कॉ.पवार करत आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here