जत,प्रतिनिधी:निगडी कार्नर येथील किराणा दुकानावर दरोडा टाकणाऱ्या तिघांना जत पोलीसांनी दवाखान्यातून अटक केली. त्यांना वीस जुनपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
सिध्दार्थ चव्हाण, बाबू काळे, रा.मधला पारधी तांडा, व वसंत पवार(रा.पूणे)या तिऩ संशयितांवर दरोडा प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
निगडी कॉर्नर येथील किराणा दुकानावर दरोडा टाकत असताना शुक्रवारी मध्यरात्री दुकानदार व नागरिकांनी त्यांना पकडले. नागरिकांच्या मारहाणीत ते जखमी झाले होते.पोलिसांनी रविवारी दवाखान्यातून त्यांना अटक केली. न्यायालसासमोर उभे केले असता त्यांना 20 जुनपर्यत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान पकडलेल्या दरोडेखोरांकडून अन्य काही चोऱ्यांचा छडा लागण्याची शक्यता आहे. दरम्यान दरोडेखोरांच्या नातेवाईकांनी फिर्यादीस दमदाटी केल्याने निगडी कॉर्नर येथे रविवारी दिवसभर विशेष पथकाचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.





