जत,प्रतिनिधी : रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर शनिवारी मुस्लिम समाज बांधवानी ईद-उल-फितरची नमाज अदा केली. स्थानिक ईद गाह येथे सकाळपासूनच मुस्लिम समाजातील आबाल वृध्दांची गर्दी दिसून आली. नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. मुस्लिम समाज बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकीय पक्षाचे पुढारीही या ठिकाणी पोहोचले होते. काँग्रेस,राष्ट्रवादी आणि भाजपच्यावतीने मुस्लिम समाज बांधवांचे स्वागत करण्यात आले. घरी पोहोचल्यानंतर आबालवृध्दांनी सिरखुरम्याचा मनमुराद आनंद लुटला.दिवसभर मुस्लिम बांधवानी मित्र, हिंदू बांधवाना ईद निमित्त केलेल्या सिरकुमा वाटप केले. त्यामुळे मुस्लिम गल्लीत गर्दी झाली होती.





