जाडरबोबलाद | उटगी,संख,बोर्गी,उमदी,गुडापूर सनमडी केंद्रात शैक्षणिक सत्राची उत्साहात सुरूवात |

0

जत,वार्ताहर:जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळेत आज नवागत मुलांचे  गुलाबपुष्प देऊन स्वागत करून मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले.काही शाळेत प्रवेशद्वार जवळ रांगोळी  व फुलांची सजावट करण्यात आली होती. नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस सर्वत्र उत्साहात  व विविध कार्यक्रमाने सुरु झाले.शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांतर्गत आज जत तालुक्यातील जाडरबोबलाद उटगी संख बोर्गी  उमदी गुडापूर सनमडी केंद्रातील शाळांमध्ये उत्साही वातावरणामध्ये शैक्षणिक सत्राची सुरुवात झाली.
कोणतेही काम यशस्वी व्हावयाचे असेल तर त्याची सुरुवात चांगली असायला लागते. जिल्हा परिषद शाळांमधील आजचा प्रवेशाचा व पाठ्यपुस्तक वाटपाचा कार्यक्रम पाहता जिल्हा परिषदेच्या शाळा नक्कीच गगनभरारी घेतील अशी आशा वाटते असे गौरवोद्गार माजी जिल्हा परिषद सदस्य ईश्वरप्पा रवी पाटील यांनी जाडरबोबलाद येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घेण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी काढले. यावेळी उपसरपंच प्रकाश काटे ग्रामपंचायत सदस्य भारत सूर्यवंशी  शिक्षण विस्तार अधिकारी बसवराज बडीगेर उपस्थित होते.सूत्रसंचालन विठ्ठल पाटील यांनी तर आभार गोविंद कोरे यांनी मानले. सूर्यवंशी कडून कबड्डी संघातील मुलांना खेळाचे साहित्य व गणवेश देण्यात आले. लकडेवाडी प्राथमिक शाळेत केंद्रप्रमुख बडीगेर यांच्या हस्ते नवागत  मुलांचे पुष्प देऊन पुस्तके वाटप करण्यात आले. यावेळी सिद्धेश्वर कोरे, लखन होनमोरे,  दादासाहेब कोडलकर रामचंद्र पांढरे उपस्थित होते.सनमडी येथील उच्च प्राथमिक शाळेत केंद्रप्रमुख एस एम शिंदे, शाळा समितीच्या अध्यक्ष सौ छाया गयाळी मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष काटे यांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव व पुस्तक वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. तालुक्यातील गावागावांमध्ये अनेक लोकप्रतिनिधी व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी यांनी आज शाळेच्या प्रथम दिनानिमित्त शाळेत हजेरी लावून इयत्ता 1 लीत प्रवेश घेणाऱ्या व नवागत विद्यार्थ्यांचे फुल देवून स्वागत केले व मान्यवरांच्या उपस्थितीत  मोफत पाठ्यपुस्तके वाटण्यात आली.

Rate Card

जाड्डरबोबलाद ता.जत येथे नव्या सत्रात विद्यार्थ्यांना पुष्प, व पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.