जत,प्रतिनिधी: येथील लायन्स क्लब जतच्या वतीने मुस्लिम बांधवाना रमजान महिन्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी इप्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भाजप नेते डॉ. रविंद्र आरळी, माजी सभापती प्रकाशरावजी जमदाडे, माजी नगराध्यक्ष इकबाल गंवडी,बंदेनवाज पटाईत,रशिद पटाईत, महबूब गंवडी, पापा नदाफ, शफीक इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते. लायन्स क्लबच्या वतीने मुस्लिम बांधवाना रोजा सोडण्यासाठी खाऊचे वाटप करण्यात आले. पुण्य व शांतीसाठी रमजान महिन्यातील उपवासाचे मोठे महत्व आहे. मुस्लिम बांधव उपवास अधिक कडकपणे करतात.त्यामुळे भक्तीपण होते व शरिर स्वास्थालाही रोजाचे फायदे होतात.असे यावेळी डॉ.रविंद्र आरळी यांनी सांगितले.
जत,लायन्स क्लबच्या वतीने मुस्लिम बांधवाना रमजान ईद निमित्त इप्तार पार्टी देण्यात आली.





