माडग्याळ | कुलाळवाडी शाळेने जपले पर्यावरण महत्व | www.sankettimes.com

0
133

माडग्याळ,वार्ताहर:जि.प.शाळा कुलाळवाडीने वनराई फुलवली आहे.मागील दोन वर्षांपासून वृक्ष लागवड व संवर्धन करून शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी शाळेचा व गावचा परिसर हिरवागार केला आहे. पूर्वी उजाड दिसणारा हा परिसर उन्हाळ्यात ही हिरवाईने नटलेला आहे. या सर्व झाडांना कुंपन करून,व अहोरात्र मेहनत घेऊन कुलाळवाडीतील शिक्षकांनी झाडांचे रक्षण केले आहे.सध्या संपूर्ण परिसरात 200 हून अधिक वृक्ष तयार झाले आहेत व या सर्व झाडांना शिक्षकांनी स्वतःवर्गणी गोळा करून ठिबक द्वारे पाणी देण्याची सुविधा केली आहे. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.वळवी सर,प्रकाश माळी, सोमनिग माळी सर,वसावे सर, गारे सर,गर्जे सर,दहिफळे सर, मणेरी सर व वनखंडे मॅडम य तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मेहनत करत आहेत.

कुलाळवाडी शाळेने जपले पर्यावरण महत्व जाणून वृक्ष लागवड करून संगोपन केले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here