जत | आत्मक्लेश अंदोलना नंतरतरी पालिकेत सुधारणा होणार का? | www.sankettimes.com

0
4

जत, प्रतिनिधी: जत नगरपालिकेचा कारभार सहा वर्षापासून जैसे-थेच असल्याने नागरिकांतून उद्रेक होत आहे.त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांच्या पालिका कारभाराच्या निर्षेधार्थ अात्मक्लेष अंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला.भाजप नगरसेवकही अंदोलनात सहभागी होते.आत्मक्लेश आम्हाला होतोयं हे दाखवून दिले. पालिकेला स्थापना होऊन सहा वर्षे उलटली आहेत.पहिले पाच वर्षे सत्ताधाऱ्यांच्या भष्ट्र कारभारविरोधात दुसरी निवडणूक लढत झाली.तुफान आरोप झाले.एकमेकांची उणीधुणी काढण्यात आली.सत्तेचा गैरवापर झाल्याचाही आरोप झाला.तरीही सत्ता पुन्हा सत्ताधारी गटाकडे टेकूने का होईना आली आहे.त्यामुळे गतवेळचे सर्वकाही बंद करून नव्याने विकासाच्या योजना सुरू झाल्याचे कळतेयं.प्रत्यक्षात कसा विकास सुरू आहे.हे प्रत्येक सभेतील वादातून स्पष्ट होत आहे. जत शहरातील खऱ्या नागरिकांच्या हिताच्या कोणत्या सुविद्या दिल्या जातायतं यावर संशोधन करावे लागले. प्रत्यक्षात जे प्रश्न ग्रामपंचायत काळात होते ते सहा वर्षानंतरही कायम आहेत.खड्ड्याचे रस्ते,फुटक्या गटारी,तुंबलेले ओढापात्रे,डासाचा उच्छांद,अनियमित पाणी पुरवठा, क्रिडागणे,विस्तारीत भागातील समस्या कायम आहेत.त्यामुळे पालिका प्रशासनाविरोधात नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. नागरिकही काही बदल होणार नाही म्हणून मुगिळून गप्प आहेत.प्रशासन,पदाधिकारी त्यांच्या पध्दतीने विकास योजना राबवत आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here