जत | गुहाघर-विजापूर मार्गाच्या खड्ड्याचा घेर वाढला पावसात खड्ड्याची आवस्था नाल्यासारखी : संबधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

0
10

जत,(का.प्रतिनिधी):अत्यंत वर्दळीच्या विजापूर-गुहाघर राज्य मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असून रस्त्यावर आता खड्डे पडायलाही जागा नाही.खड्ड्याचा घेर तीन फुटापर्यत वाढला आहे. रस्त्याच्या झालेल्या चाळणीने वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे. राज़्य महामार्ग म्हणवून घेणारा हा रस्ता पूर्णत: उखडला असून रस्त्याच्या चाळणीने वाहन धारकाच़्या कबरें,मान,मणक्याचे आजार बळावंत आहेत. जत तालुक्यातील धावडवाडी ते मुंचडी पर्यत जत तालुक्यातून जातो. जत शहरातून जात असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. तसेच दोन राज्याचे दळणवळण या महामार्ग वरून होत असल्याने अवजड वाहने मोठ्या संख्येने जा-ये करतात.गत उन्हाळय़ापासून या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्याची तर अक्षरश: चाळणी झाली आहे. डांबर पूर्णत: उखडून गेले असून या रस्त्यावरून वाहनधारकांना चालताना मोठी कसरत करावी लागते. जत परिसरातून विजापूर,साताराला जाण्यासाठी अगदीजवळचा मार्ग म्हणून हा मार्ग ओळखला जातो. परंतु या रस्त्याच्या दुरुस्तीकडे कुणाचेही लक्ष दिसत नाही.
जत शहरातील रस्त्याचीही अशीच अवस्था झाली आहे. रस्त्या नव्हेच अशी काहीशी खड्ड्यामुळे आवस्था झाली आहे. मोठा पाऊस झाल्यास या रस्त्यावरून वाहन चालकांना जीव मुठीत घेऊनच चालावे लागते.मोठ मोठ्या खड्ड्यात पाणी साठून डबक्याचे स्वरूप येत आहेत. त्यामुळे लहान वाहने चालविणे म्हणजे विघ्न बनले आहे.अनेक ठिकाणी रस्ता पूर्णत: उखडला आहे. या रस्त्यावरून दुचाकी वाहन चालविताना वाहनधारक त्रस्त होऊन जातो. रस्त्यावरून चालण्यापेक्षा रस्त्याच्या बाजूने जाणेच वाहनधारक पसंत करतात.रस्त्याकडे कुणीही लक्ष देत नाही. यामुळे अपघाताची भीती वाढली असून वाहनधारक मात्र नाईलाजाने या मार्गावरून प्रवास करतात. शहरात अनेक वाहने नादुरुस्त होऊन रस्त्याच्या कडेला उभी दिसतात. संबधित विभाग रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष का देत नाही हा संशोधनाचा विषय झाला आहे. या रस्त्यावरून जाताना वाहनधारकांच्या अंगावर मात्र काटा येतो.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here