संख | बसस्टॉप ते डॉ.आंबेडकर चौकापर्यच्या मार्गाचे डांबरीकरणाची मागणी | www.sankettimes.com

0

संख,वार्ताहर: येथून अंकलगीकडे जाणारा रस्ता वाहतूक कोंडीला आमत्रंण बनत आहे. अगोदरच खड्ड्याचा रस्ता,अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होत आहे. एकादेवेळी अवजड वाहन जाताना मागे इतर वाहनाची रांग लागते.माडग्याळ, उमदी,जाड्डरबोबलाद, सोन्याळ, उटगी सह परिसरातील गावांना जाणारा हा महत्वाचा रोड आहे. संख अप्पर तहसिल कार्यालयामुळे या भागातून येणाऱ्या नागरिकांचा हा रस्ता आहे.गेल्यी अनेक वर्षापासून संख बस स्टॉप ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यत या मार्गाचे डांबरीकरण व रूंदीकरण करण्याती मागणी अनेक वर्षापासून आहे.मात्र त्या मागणीकडे संबधित विभागाकडून दुर्लक्ष झाले आहेत. परिणामी दुरूस्ती अभावी रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. त्यातच पावसात पाणी साठून डबके बनतात.व वाहतूकीस अडचणीचे ठरत आहे. वाहतूक कोंडी कारण ठरत आहे. सतत कोडींमुळे वाटसरूनां धोका निर्माण झाला आहे. कधी अपघात होईल हे सांगता येत नाही,त्यामुळे तातडीने या रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे.

Rate Card

संख बसस्टॉप ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यच्या मार्गावरून नित्याच्या वाहतूक कोंडीमुळे धोका निर्माण झाला आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.