मिरवाडचे ग्रामसेवक एम.एम.म्हमाणे यांची बदली झाल्याबद्दल सत्कार

0
8

डफळापूर, वार्ताहर: मिरवाड(ता.जत)ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एम.एम.म्हमाणे यांची बदली झाल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने संरपच संभाजी सवदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गेल्या पाच वर्षापासून म्हमाणे हे मिरवाड येथे कार्यरत होते.स्वच्छ, पारदर्शी कारभार, ग्रामस्थाच्या हिताला प्राधान्य देत म्हमाणे यांनी काम केले आहे.म्हमाणे यांनी मिरवाड येथील प्रसिध्द देवस्थान श्री. महालिंगेश्वर मंदिराच्या कामासाठी 50 हाजार रूपयाची देणगीही यावेळी देवस्थान कमिटीकडे दिली.आमच्या ग्रामपंचायतीला चांगल काम करून म्हमाणे यांनी पदाधिकाऱ्यासह, ग्रामस्थांचा विश्वास जिंकला होता.चांगले अधिकारी गावे संमृध्द करू शकतात.म्हमाणे यांच्या बदलीमुळे आम्ही एक चांगल्या ग्रामसेवकांला मुकलो असल्याची खंत संरपच संभाजी सवदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.यावेळी माजी संरपच आण्णासाहेब चव्हाण,शहाजी हांडे,गणपती हांडे,सोसायटीचे सदस्य,यल्लाप्पा तोडकर, ग्रा.प.सदस्य सिंध्दू गावडे,ग्रा.प.सदस्य सागर सवदे,आकाश कांबळे, ज्ञानदेव हांडे, पिंटू नाईक,गणेश सवदे,वंसत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

मिरवाड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एम.एम.म्हमाणे यांची बदली झाल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here