उमदी | 67 लाखाचा गांजा पकडला : उमदी पोलिसांचा करजगीत ऊसातील गांज्या शेतीवर छापा: जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई

0

जत,प्रतिनिधी : करजगी ता.जत येथील महेश उर्फ पिंटू मल्लाप्पा पट्टनशेट्टी,श्रीशैल मल्लाप्पा पट्टनशेट्टी यांच्या शेत जमिनीत बेकायदेशीर लावलेला सुमारे 1350 किलो गांजाची ओली झाडे जप्त करत सुमारे 67 लाखाचा मुद्देमाल जप्त करत जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई डिवायएसपी नागनाथ वाकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलिसांनी केली.ही जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे.गांज्याची झाडे टॅक्टर मध्ये भरून उमदी पोलि
अधिक माहिती अशी, करजगी येथे पट्टनशेटी बंन्धूनी ऊसाच्या शेतात बेकायदेशीर गांज्याच्या झाडाची लागवड केल्याची माहिती उमदी पोलिसाना खबऱ्याद्वारे मिळाली होती.
त्या आधारे उमदी पोलिसांनी गांज्या शेतीवर छापा टाकला असता. ऊसाच्या फडात प्रंचड गांज्याची झाडे आढळूंन आली.ती सर्व झाडे काढून उमदी पोलिसांनी जप्त केली.सुमारे सात ते आठ फुटापर्यत वाढलेली 1350 किलोग्राम वजनाची ओलसर झाडे किंमत अंदाजे 67 लाख 50 हाजार किंमतीची झाडे मिळाली आहेत.सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. यांची खबर चालक हे.का.सुधाकर पाटील यांची आहे.दोन्ही सशयिंत आरोपी फरारी झाले आहेत. त्यांच्या तपास सुरू आहे.या कारवाईत जतचे डिवायएसपी नागनाथ वाकुडे, सा.पोलिस निरिक्षक भगवान शिंदे,प्रविण संपागे,हे.कॉ.बामणे,कोळी,पो.ना.आटपाडकर,नितिन पलूसकर,घोदे,बन्नेण्णावर, सागर पाटील,दिलिप इंगळे,प्रकाश वाघमारे यांनी छापा टाकत ही कारवाई केली. याबाबतची फिर्याद श्रीशैल वळसंग यांनी दिली असून अधिक तपास सा.पो.निरिक्षक बी.बी.शिंदे करत आहेत.जत पुर्व भागातील गांज्या तस्करीचे उच्छाटन करण्यासाठी उमदी पोलिसांनी चंग बांधला आहे.त्याचा भाग म्हणून अशा कारवाया सुरू आहेत. यापुढे सर्व भागात छापामारी करून पुर्ण:गांजा मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील असे पोलिसानी सांगितले.

स ठाण्यात आणण्यात आली.याप्रकरणी सशयिंत आरोपी फरारी झाले आहेत.

Rate Card

भर पडत्या पावसात गांज्याची कारवाई करण्याचे काम डिवायएसपी पोलिस नागनाथ वाकुडे,सा. पोलिस निरिक्षक भगवान शिंदे व कर्मचाऱ्यांनी केले.

करजगी ता.जत येथे ऊसाच्या शेतात बेकायदेशीर लावलेल्या  गांज्या शेतीवर उमदी पोलिसांनी छापा टाकत मुद्देमाल जप्त केला.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.