मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील बालाजी नगर या ओसाड माळरानावर जनहिताची आवड असलेले श्रीकांत पवार सर यांनी स्वतः उच्च शिक्षित असून,आश्रम शाळा बालाजी नगर येथे करत असलेली नोकरी सोडून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीला योग्य मार्गदर्शन ग्रामीण भागात उपलब्धं व्हावेत. आपल्या बरोबर ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील शेकडो कुटुंबाचे कल्याण झाले पाहिजेत. हीच अपेक्षा उराशी बाळगून पंरपरागतेला फाटा देत भारत नाना भालके करियर अकॅडेमी सुरू केली आहे. बालाजी नगर भरती पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून इवलेसे लावलेले रोपटे आज विशाल अशा वटवृक्ष झालेले आहे. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळते.सोई सुविधा उपलब्ध होतात,परंतू ग्रामीण भागात याची कोणतीच उणीव आज या संस्थेच्या माध्यमातून राहिलेली नाही. या प्रशिक्षण संस्थेतून दोन वर्षात शेकडो विद्यार्थी पोलिस,आर्मी,वनरक्षक, बिएसएफ,सीआरपीएफ अशा विविध ठिकाणी नियुक्ती झाले आहे. विशेष बाब म्हणजे या प्रशिक्षण केंद्रात मुलींना कोणत्याही प्रकारची फी घेतली जात नाही. ज्या मुला मुलींना भरती व्हायचे आहे.अशा होतकरू विद्यार्थ्यांना प्रशिक्षित शिक्षकांकडून शिक्षण,राहणे पासून सर्व जबाबदारी संस्थापक अध्यक्ष श्रीकांत पवार संस्थेच्या माध्यमातून पाहतात.ही प्रशिक्षण संस्था म्हणजे होतकरू ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक नव संजीवनी निर्माण झाली आहे. स्पर्धेच्या युगामध्ये नोकरभरतीची स्पर्धा असताना सुद्धा दोन वर्षात या अँकॅडमीचे शंभर पेक्षा जास्त विद्यार्थी य यशस्वी झाले आहेत.पालक संस्थेत मुलींना मोठ्या प्रमाणात प्रवेश घेऊ करत आहे.मुलींना मोठ्या प्रमाणात पोलीस करू पाहत आहे.मुलींसाठी ही संस्था म्हणजे आपले घरच आहे.याठिकाणी संपुर्ण परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या मुलींच्या देखभालीसाठी संचालिका सौ.अश्विनी पवार मॅडम मुलींच्या प्रशिक्षणासाची जबाबदारी दिली आहे. त्याही एमएस उच्चशिक्षित आहेत. संस्थेतून 100 पैकी 100 गुण मिळवून जिल्हात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक क्रमांक घेऊन विद्यार्थी यश मिळवत आहेत. सकाळी 6:00 पासून रात्री उशिरापर्यंत 11 :00 वाजेपर्यंत नित्य नियमाने फिजिकल, लेखीचे तास घेतले जातात, तर गरजू गुणवंत मुला मुलींनी प्रवेश घेऊन आपले करियर करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत पवार सर यांनी केले आहे.एक सामाजिक जबाबदारी म्हणून भरती झालेले विद्यार्थी आपआपल्या परीने संस्थेस मदतीचा हात देत आर्थिक मदत निधी देऊ करतात यातूनच संस्थेकंडून गरिब,होतकरू,गरजू मुला-मुलींचा नोकरी योग्य प्रशिक्षित केले जात आहे.
आमदार भारत नाना भालके करियर अकॅडेमी ग्रामीण भागात वेगळेपण जपले आहे.पर्यावरण पुरक वातावरणात तज्ञ शिक्षकांचे प्रशिक्षण ग्रामीण विद्यार्थ्यांना वरदान आहे.गरिब होतकरू विद्यार्थ्यांना अल्प दरात प्रशिक्षण मिळावे यासाठी जनहित डोळ्यासमोर ठेऊन आम्ही ही अॅकॅडमी चालवित आहोत.
– श्रीकांत पवार सर,संस्थापक
मी आ.भारतनाना भालके अँकॅडमीमध्ये प्रवेश घेतला,पवार सर व अॅकॅडमीच्या सर्व सरांनी कडक शिस्तबंध्द व योग्य मार्गदर्शनाखाली मेहनत,व योग्य अभ्यास केल्याने माझे स्वप्न साकार झाले आहे. सामान्य घरातील मुंलाना ही अॅकॅडमी आपलेच घर असल्याचे जाणवते.
राजकुमार खलाटी, ठाणे पोलिस
मुलींसाठी सुरक्षित,सर्व सोयीयुक्त अॅकॅडमी आहे.अगदी शिस्त,कुठेही प्रशिक्षण घेताना तडजोड नसणे,मुलींना मार्गदर्शन व आई-वडीलाच्या सारखे विश्वासांचे वातावरण आम्हाला यशस्वी करून गेला.पवार सर व टीमचे सशस्त प्रशिक्षण व शिस्तबंध्दता ग्रामीण भागातील नोकरी करू इच्छिंत मुलीना ही अॅकॅडमी वरदान आहे.
श्रीदेवी देसाई,नंदूर : पुणे शहर पोलिस
या अॅकॅडमी जेवन,पशिक्षण संस्थेने मोफत दिला.कडक शिस्त व योग्य गाऊंड,लेखी प्रशिक्षण,गरिब परिस्थिती,कोणतीही फी देण्यासाठी पैसे नसतानाही संस्थेने आम्हाला मोफत शिकविले.त्याचे फळ मला मिळाले आहे.सध्या पवार सराच्या मुळे मी नोकरी करत आहे.
पुजा करडे,बलवडी : सोलापुर ग्रामीण पोलिस
मंगळवेढा येथील आ.भारतनाना भालके अँकॅडमीचे खडतर प्रशिक्षणाचा एक क्षण