येळवी | रक्तदात्याच्यांमुळे चिमुकलीचे वाचले प्राण |www.sankettimes.com

0
5

येळवी,वार्ताहर :येथील ओंकारस्वरूपा ग्रुपच्या येळवीे महोत्सवा दरम्यान घेतलेल्या रक्तदान शिबिरातील अविनाश पोरे या रक्तदात्यामुळे जत येथील महेश निकम यांच्या दोन वर्षांच्या मुलीचे प्राण वाचले.महेश निकम यांचे मित्र मोहन माने पाटील यांनी   दोन वर्षांच्या प्रगती या मुलीच्या पेशी कमी झाल्या असून तिच्यावर मिरजेत उपचार सुरू आहेत. तिला डेंगू व मलेरियाची लागण झाली असून तात्काळ ए- निगेटीव्ह रक्ताची गरज असल्याची पोस्ट व्हाट्सअप ग्रुप वर टाकून रक्तदात्यांना आवाहन केले होते.ही पोस्ट पाहताच ओंकारस्वरूपा टीमने मोहन माने पाटील यांच्याशी संपर्क साधत त्यांच्याकडे 30 रक्तदात्यांची यादी दिली. या 30 जणांमधून येळवी येथील अष्टविनायक व आधार फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अविनाश पोरे यांचे ब्लड मॅच झाले. अविनाश पोरे यांनीही तात्काळ आपले ब्लड चिमुकल्या प्रगतीला द्यावे असे ब्लड बँकेला सांगितले. त्यानुसार ब्लड बँकेने तात्काळ प्रगतीला अविनाश पोरे यांनी दिलेले ब्लड दिले व रक्त मिळताच तातडीने उपचार झाल्याने तिचे प्राण वाचले आहेत.  आपण केलेल्या रक्तदानाने चिमुकली प्रगतीचे प्राण वाचविण्यात यश मिळाले.दरम्यान समाजहितासाठी काम करणाऱ्या अविनाश पोरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. येळवी सारख्या लहान गावात असे उपक्रम राबवून ओंकारस्वरूपा ग्रुपने आदर्श निर्माण केला आहे. निकम कुटूंबीयांनी फौंडेशन व पोरे यांचे आभार मानले.रक्तदान केल्यास जे कार्ड आपणास मिळते,त्या कार्डावरून आपण  दोन वर्षात कोणालाही रक्तदान देता येते. तेव्हा तरुणांनी रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन यावेळी दीपक अंकलगी,अविनाश पोरे यांनी यावेळी केले.

रक्तदान मिळालेली वाचलेली प्रगती निकम,रक्तदाते अविनाश पोरे

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here