जत | मुख्यमंञ्याच्या दौऱ्यांने पाणी चळवळीला बंळ आंवढी, बागलवाडी थेट श्रमदान करत साधला संवाद |

0
9

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील पाणी फौंडेशनच्या कामातून दुष्काळ मुक्तीसाठी झपाटलेल्या गांवानी श्रमदान करून राज्यात ठसा उमटविला.त्या आंवढी, बागलवाडी गावांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत ग्रामस्थांचे आभार मानत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरक्षंण कडे तोडून थेट डोंगर पायथ्याशी श्रमदान करत असलेल्या नागरिकांच्या बरोबर काही वेळ श्रमदान केले.थेट माताभगीनी,लहानगे व नागरिकांशी संवाद साधत दुष्काळ मुक्तीसाठी हे काम तुमचे नशीब बदलेल.सरकाराची योजना पेक्षा लोकचळवळीतून घडलेले आंवढीकरांचे हे कार्य राज्यभर आदर्श ठरेलं असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जत तालुक्यातील आंवढी व बागलवाडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी भेट दिली.त्यांच्या सोबत आमदार विलासराव जगताप, सुरेश खाडे,पाणी फांऊडेशनचे डॉ.अविनाश पोळ, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, डॉ.रविंद्र आरळी, जिल्हा बँक संचालक विक्रमसिंह सांवत, जिल्हा परिषद शिक्षण सभापती तम्माणगोंडा पाटील,पंचायत समिती सभापती मंगल जमदाडे,माजी सभापती प्रकाश जमदाडे,अॅड.श्रीपाद अष्टेकर आदी मान्यवर उपस्थित होते.दुष्काळी तालुका,टँकरने बजबजलेल्या या तालुक्यातील श्रमदानातून दुष्काळमुक्त होणार आहे.

पोकलड,जेसीबी मशीनसाठी डिजेलसाठी निधी देऊ
दरम्यान आमदार विलासराव जगताप यांनी पाणी फौंडेशनच्या बरोबर पोकलड, जेसीबी मशिनद्वारे जलसंधारणासाठी जैन संघटनेच्या मशिन काम करत आहेत.सध्या त्या मशिनच्या डिजेलसाठी निधीची कमतरता भासत आहे. त्यासाठी निधी द्यावा अशी मागणी केली.त्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,जत तालुक्यातील या जलसंधारण कामासाठी मशिनला लागणाऱ्या निधीची व्यवस्था मी करतो.जत तालुका दुष्काळ मुक्त झाला पाहिजे यासाठी ग्रामस्थांनी पाण्याचे महत्व ओळखून काम करावे.

जत तालुक्यातील आंवढी येथील पाणी फौंडेशनच्या कामाच्या पाहणीसाठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट नागरिकांच्या मिसळून श्रमदान केले.त्यांनतर फडणवीस यांनी नागरिकांशी संवाद साधला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here