कोसारी, वार्ताहर:कोसारी(ता.जत)येथील साठवण तलावात पाण्याची पातळी 40 टक्क्यांहून कमी झाली असतानाही अनाधिकृत पाणी उपसा जोमात चालू आहे. सध्या तलावात फक्त 10 ते 12 शेतकऱ्यांकडेच एच. पी. परवाना असून तलावातून सुमारे 150 पाणी उपसा यंञाद्वारे विना परवाणा पाणी उचलले जात आहे. (लघुसिंचन) जलसंधारण प्रशासनाचे माञ याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे तलावातील पाणी साठा लवकरच संपवण्याची भिती व्यक्त होत आहे.भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.त्यामुळे तातडीने विनापरवाणा मोटारी जप्त कराव्यात अशी मागणी होत आहे.
कोसारी(ता.जत) साठवण तलावातून अशा अनाधिकृत मोटारी लावून पाणी उपसा सुरू आहे.





