जत | ग्रामपंचायत निवडणूक : थेट संरपच 25,सदस्य 214 अर्ज दाखल www.sankettimes.cpm

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील सहा ग्रामपंचायती व चार गावच्या पोटनिवडणूकीसाठी शनिवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यत थेट संरपच पदासाठी 25,तर सदस्यसाठी 214 अर्ज दाखल झाले आहेत.सर्वाधिंक 78अर्ज उमदीत दाखल झाले आहेत तालुक्यातील बिंळूर, खिलारवाडी, गुजगुंजनाळ,कोतेबोबलाद, कोनबगी,उमदी या गावातील ग्रामपंचायती व अंकलगी, धुळकरवाडी,अमृत्तवाडी,एंकूडी गावात पोट निवडणूक होत आहे. शेवटच्या दिवशी अगदी सात वाजेपर्यत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.अखेरच्या दिवशी मोठ्या प्रमाणात अर्ज भरले गेले आहेत.सोमवारी अर्ज छाणणी आहे.त्यानंतर अर्ज माघारी नंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. सर्वाधिंक महत्वपुर्ण उमदी,कोतेबोबलाद, बिंळूर या गावातील निवडणूका चुरसीच्या होणार आहेत.कोतेबोबलाद आमदार विलासराव जगताप यांचे गाव आहे.त्यामुळे मोठा संघर्ष निश्चित आहे. उमदीत माजी जि.प.सदस्या रेश्माक्का होर्ती,जि.प.सदस्य चन्नाप्पा होर्तिकर ,कॉग्रेस नेते विक्रमसिंह सांवत यांचे होम गाऊंड आहेत.तर बिंळूर पंचायत समिती सदस्य रामाण्णा जिव्वाणावर,कॉग्रेसचे जेष्ठ नेते पी.एम.पाटील यांचे गाव अाहे.त्यामुळे येथील निवडणूका प्रतिष्ठेच्या होणार आहेत. त्यामुळे अर्ज दाखल करण्यापासून चुरस पाह्याला मिळत आहे. अगदी उमेदवारांची खेचाखेचीपर्यत प्रयत्न झालेत. दरम्यान कोणबगी गावाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. बाकी गावात संघर्ष अटळ आहे.
गाववार दाख अर्ज असे,बिंळूर:थेट संरपच-6,सदस्य-69,खिलारवाडी:थेट संरपच 4,सदस्यसाठी 7,गुजगुंजनाळ: थेट संरपच -5,सदस्य-18,कोतेबोबलाद: थेट संरपच-3,सदस्य-32,कोनबगी: थेट संरपच- 1,सदस्य-6,उमदी : थेट संरपच -5,सदस्य -73,अंकलगी :सदस्य -1,धुळकरवाडी : एक जागेसाठी 3 अर्ज,अमृत्तवाडी :एक जागेसाठी 2,एंकूडी : एका जागेसाठी 1

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.