जत,प्रतिनिधी : जतचे कार्यसम्राट आमदार विलासराव जगताप यांच्या आज वाढदिवस उत्साहत साजरा करण्यात आला. गेल्या तीन दशकाहून जास्त काळ जतच्या राजकारणातील किंगमेकर म्हणून राज्यभर परिचित असलेले आमदार यांना माननारा तालुक्यात मोठा वर्ग आहे.तालुक्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती,सोसायटीत त्यांच्या समर्थकांची सत्ता सामान्य स्थितीतून आमदार पदापर्यतचा त्याचे कार्य प्रेरणादायी आहे.त्यांचा 1 मे वाढदिवस मोठ्या उत्साहत साजरा करण्यात येतो.सकाळी सहा वाजलेपासून आमदार साहेबाना शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकारी,अधिकारी, कार्यकर्ते,नागरिकांनी गर्दी केली होती. मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जंयतराव पाटील, खा.संजय पाटील, आ.सुरेश खाडे,सुधिर गाडगीळ,शिवाजीराव नाईक,अनिल बाबर,भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिपचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख,सह राज्यातील अनेक मान्यवर,पदाधिकाऱ्यांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या.भाजपा नेते डॉ.रविंद्र आरळी,श्रीपाद अष्टेकर,माजी सभापती प्रकाश जमदाडे, सभापती तम्मानगौंडा रवीपाटील, आर.के.पाटील,जि.प.सदस्य सरदार पाटील,सौ.रेखा बागेळी, अॅड.प्रभाकर जाधव,फर्टिलायझर असोशिएशनचे अध्यक्ष राजाभाऊ कन्नुरे,आर.के.माने,मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुभाषराव गायकवाड,युवक नेते परशुराम चव्हाण सर,संजय तेली,शशिंकात जाधव,सौ.देवयांनी गावडे,सह तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, सामान्य नागरिकांनी शुभेच्छा देत साहेबचे अभिष्टचिंतन केले.आमदार जगताप यांनी सर्वाच्या शुभेच्छा स्विकारल्या.
जतचे लोकप्रिय आमदार विलासराव जगताप यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहत संपन्न झाला. आ.जगताप कुंटुबियांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आ.जगताप यांच्या पत्नी, चिरंजिव,सुष्ना,नांतवडे उपस्थित होते.