जत | प्रतापपूर मध्ये तणावपूर्ण शांतता पोलिसावर हल्ला प्रकरण : 27 जणावर गुन्हा दाखल | www.sankettimes.com

0
20

जत,प्रतिनिधी: मंगळवारी रात्री जत तालुक्यातील प्रतापपूर येथे जत, सातारा

पोलीस ताफ्यावर तूफान दगडफेक केल्याप्रकरणी दत्ता जाधव टोळीतील 27 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेत असलेल्या 10 जणांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दत्ता जाधव याला पकडण्यासाठी खास पोलीस पथक त्याचा शोध घेत आहे. 

सातारा येथील मोका लावलेला दत्ता रामचंद्र जाधव त्याच्या मावसीचे गाव जत तालुक्यातील प्रतापपूर आहे.  गावातील वलीसाहेब पीराचा उरूस तो भरवितो. पीरास त्याचा मानाचा नैवेद्य असतो.  त्यानिमित्त गावजेवण व तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. 

यात्रेनिमित्त जाधव आपल्या सहकाऱ्यांसह गावी आल्याची माहिती सातारा पोलीसांना मिळाली होती. जत पोलीसांच्या मदतीने मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास छापा घालण्यात आला. मात्र तो पोलीसांच्या हाती लागला नाही. पोलीसांनी त्याचा भाऊ युवराजसह 10 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस व जाधव टोळीत  जोरदार धुमश्चक्री झाली. काहीजणांनी पोलिस गाड्यांवर तूफान दगडफेक केली. हल्ल्यात सहा पोलीस जखमी झाले तर तीन वाहनांचे नुकसान झाले. 

पोलीसांनी दत्ता जाधव व त्यांच्या साथीदारांविरोधात शोधमोहिम सुरू केली आहे.  त्यासाठी खास पथक तैनात केले आहे.दरम्यान प्रतापपूर गावात तणावपूर्ण शांतता आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here