मी पुरोगामी विचाराचा, मागासवर्गीय समाजाला प्रतिनिधीत्व दिले
जत,प्रतिनिधी :को.बोबलाद ग्रा.प. निवडणुकीत राजकीय फायद्यासाठी माझा मुलगा मनोज जगताप यांच्यावर विरोधकांनी खोटा गुन्हा दाखल केला असून केवळ बदनामी करण्याचा विरोधी पक्षाचा डाव आहे. मी स्वत: पुरोगामी विचाराचा आहे. त्यामुळे जातीभेद मानत नाही.मनोज यांच्यावर दाखल केलेल्या गुन्हाची निःष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी, आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार बैठकीत केली. यावेळी डॉ.रविंद्र आरळी,शिवाजीराव ताड,माजी सभापती प्रकाश जमदाडे,जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील,रामपुरचे माजी संरपच मारूती पवार, अॅड.प्रभाकर जाधव, उमेश सांवत, विजय ताड,आदी उपस्थित होते.
आ.जगताप म्हणाले,
मी 40 वर्षापासून तालुक्यातील राजकारणात आहे. माझ्या गावात मला उमेदवार मिळत नाही, म्हणून अप्रचार केला जात आहेत. एक काय पन्नास उमेदवार उभे करू शकतो. त्यामुळे कुणीही चुकीचे आरोप करू नयेत.
सोसायटीची एक निवडणूक वगळता, गेल्या
40 वर्षात कोंतेबोबलाद ग्रामपंचायत, सोसायटी निवडणूका बिनविरोध झालेल्या आहेत. 40 वर्षात मागासवर्गीय समाजातील सदस्य ग्रामपंचायत व सोसायटीत आहेत.1975 साली आरक्षण नसताना सोसायटीत मागासवर्गीय समाजातील आडव्याप्पा हरीजन यांना चेअरमन केले होते. सोसायटीत गुलगुंजनाळ, कोनबगी,करेवाडी, कोंतेबोबलाद गावे येतात. येथील निवडणूका बिनविरोध व्हाव्यात यासाठी मी बैठका घेतल्या आहेत. सोमवारचा वाद होण्याअगोदर गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठका हरिजनवाडा व मातंग समाज वस्तीमध्ये घेतल्या होत्या. तरीही काही विरोधी मंडळींनी वाद पेटवला.
पंचायत समिती निवडणूकीत मनोज जगताप यांच्या गाडीवर प्रथम व आता दुसरा हल्ला केला, त्यांचा कुणीही निषेध केला नाही.फक्त राजकीय फायद्यासाठी व तिन्ही गावात निवडणूक लागावी यासाठी हा प्रकार विरोधी मंडळी करत आहेत. कोणतेही सबळ कारण नसताना मनोज यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची सखोल चौकशी व्हावी.अशा प्रकाराने अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरूउपयोग होत आहे.
मनोज जगताप यांनी फिर्याद दिलेले संशयित गावठी पिस्तुल घेऊन आजही गावात दहशत मजावित आहेत. करेवाडी असे गुन्हेगारीचे प्रकार मोठ्या प्रमाणात आहेत.अनेक गुन्ह्यातील आरोपी घातक शस्ञे बांळगत आहेत. मी कधीही जातीभेद मानत नाही. दरवर्षी डॉ.आंबेडकर जयंतीमध्ये माझे भाषण होते. माझ्या शेतातील मजूर सोमलिंग कांबळे हा आहे.त्यामुळे बेताल आरोप करून जातीय रंग देण्याचे प्रकार बंद करावेत असे आवाहन आ.जगताप यांनी केले.





