संख | आंतरराष्ट्रीय बुध्दीबंळ स्पर्धेत द्वितीय क्रंमाक मिळविल्याबद्दल श्रेया हिप्परगी हिचा सत्कार | www.sankettimes.com

0
4

संख,वार्ताहर : थायलंड येथे 8 वर्षाखालील बुध्दीबंळ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत संख ता.जत येथील श्रेया गुराप्पा हिप्परगी हिने द्वितीय क्रंमाक मिळविल्याबद्दल भाग्यश्री सुपर मार्केटच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. संख येथील राजाराम बापू पाटील कॉलेज मध्ये शिक्षक असणारे गुराप्पा हिप्परगी यांची श्रेया कन्या आहेत.लहान वयात श्रेयाने हे अद्वितीय यश मिळविले आहे. राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर श्रेयाने अनेक स्पर्धेत उत्तुंग कामगिरी केली आहे.तिच्या यशाबद्दल श्रेयाचा सत्कार प्रा.आर.बी.पाटील यांच्या हस्ते शाल,श्रीफळ देऊन करण्यात आला.तसेच वडील गुराप्पा हिप्परगी यांचा सत्कार रांजेद्र हलकुडे यांनी केला.यावेळी डॉ.संभाजी जाधव,मल्लिकार्जून व्हनगोंड,माजी सैनिक व्हनमराठे,गुरनिंग कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. नियोजन भाग्यश्री सुपर मार्केटचे संचालक अप्पु पुजारी,अहमद शेख यांनी केले.

संख :आंतरराष्ट्रीय पातळीवर बुध्दीबंळ स्पर्धेत द्वितीय क्रंमाक मिळविल्याबद्दल श्रेया हिप्परगी हिचा सत्कार करण्यात आला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here