जत | विक्रम ढोणे यांचे कार्य कौतुकास्पद : अभिजीत पाटील | www.sankettimes.com

0
9

जतेत ना.महादेवजी जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम 

जत,प्रतिनिधी : 

विक्रम ढोणे यांच्या प्रयत्नातून जत येथे पशुसंवर्धन मंत्री ना.महादेवरावजी जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व युवकांसाठी उद्योग एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा झाली.

कार्यक्रमाचे उद्धाटन तहसीलदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना तहसिलदार पाटील म्हणाले, विक्रम ढोणे यांच्यासारख्या सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या युवकांची आपल्या देशाला गरज आहे. ढोणे यांनी सामाजिक कार्य अंखड सुरू ठेवावे.असे आवाहन पाटील यांनी केले.

यावेळी अनिल मिसाळ,गणेश गिड्डे,उत्तम महारनूर,आण्णा टेंगले,नानासाहेब भोसले,किसन टेंगले त्याचबरोबर जत तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.संयोजन विक्रम ढोणे यांनी केले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here