जत,प्रतिनिधी : जत येथील सिध्दार्थ पॉलिटेक्निकच्या वतीने बेरोजगार विद्यार्थ्यासाठी नोकरी मेळावामेळावा(कॅम्पस) बुधवार ता.11एप्रिलला आयोजित केला आहे. त्यात पुणे येथी दुत ट्रान्समशिन चाकण यांच्या कंपनीत नोकरीची संधी उपलब्धं होणार आहे.यासाठी
प्रवेश पात्रता:डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन/डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल/डिप्लोमा इन कॉम्प्युटर/एम. सी. व्ही. सी(MCVC) /बी. सी. ऐ(BCA) असे शिक्षण आवश्यक आहे.निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एक लाख 60 हजार प्रती वर्ष पगार,एक वेळ जेवण आणि प्रवास फ्री असे पगाराचे स्वरूप आहे.या मेळाव्यात सुमारे 100 विद्यार्थ्यांचे सिलेक्शन करण्यात येणार आहे. निवडीसाठी फक्त मुलाखत घेतली जाईल,त्या आधारे निवड प्रक्रिया पुर्ण होणार आहे.असे प्राचार्य वाघमारे यांनी सांगितले. या संधीचा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. कैलास सनमडीकर यांनी केले आहे.



