जत,प्रतिनिधी : जत येथे घरगुती करणावरून पुतण्याने चुलत्यावर चाकूचा वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.सुदैवाने पोलिसांनी मध्यस्थी केल्याने चुलत्याचा जीव वाचला.नसीर राजासाहेब शेख (वय-48,रा.स्टँडसमोर जत)असे जखमी चुलत्याचे नाव आहे.घटना मंगळवारी सायकांळी चारच्या सुमारास जत-सांगली रोडवर पोलिस स्टेशन नजिक घडली.याप्रकरणी जत पोलिसात रात्री उशिरापर्यत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दोघा पुतण्यानां ताब्यात घेतले आहे.
घटना स्थळ व पोलिसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी,नसीर व दोन पुतणे अमिर बादशाह शेख (वय-30), व नौशिद बादशाह शेख (वय-25) यांच्या स्टँडसमोरील घराजवळ किरकोळ बाचाबाची झाली. काही उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करत तेथील भांडण सोडविले होते. भांडणात पुतण्याची आई शकीरा व नसीर किरकोळ जखमी झाले होते.दरम्यान नसीर जत पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्याकडे जात असताना जत-सांगली रोडवरील पोलिस स्टेशन,प्रांतकार्यालय नजिक मागून दुचाकीवरून आलेल्या दोन्ही पुतण्यानी आईला मारल्याचा राग मनात धरून नसीरच्या दुचाकीला धक्का देत नसीर यांना खाली पाडले,व लाथा बुक्यानी मारहाण करत,एकाने चाकूने नसीर यांच्यावर वार केला,लगतच चहा पिण्यासाठी आलेले पोलिस निरिक्षक गजानन कांबळे व काही पोलिसांनी हस्तक्षेप करत नसीर यांची सुटका केली. पुतण्यानां ताब्यात घेत नसीर यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलविले. हल्यात नसीर गंभीर जखमी असून त्याच्यावर सांगलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.त्यांची प्रकृत्ती गंभीर असल्याचे कळतेयं अधिक तपास पोलिस निरिक्षक चव्हाण करत आहेत.





