पंचायत समिती सदस्य रविंद्र सांवत यांच्यावर हल्ला
जत,प्रतिनिधी जत तालुक्यातील बनाळी येथे राजकीय वादातून कॉग्रेस नेते तथा पंचायत समिती सदस्य रविंद्र तानाजी सांवत व त्यांचे मित्र हणमंत सखाराम सांवत यांच्यावर हल्ला करत गंभीर मारहाण करण्यात आली. यात
दोघेही जखमी झाले आहेत.ही घटना सोमवारी सध्याकांळी आकराच्या सुमारास घडली.याबाबतचा गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी,बनाळीचे असलेले रविंद्र सांवत सोमवारी सध्याकांळी मित्राबोरबर घरी जात असताना सात आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला.त्यात ते व मित्र हणमंत सांवत गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्यांवर भारती हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सांवत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनिल जगन्नाथ जाधव,मिलिंद शिवाजी पाटील,सचिन ब्रम्हदेव जगताप, संतोष ब्रम्हदेव जगताप, स्वप्निल मारूती सांवत,अविनाश आण्णासो सांवत,सुदर्शन काशिनाथ सांवत (सर्व रा.बनाळी) या सात जणावर गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान पंचायत समितीचे गटनेते असलेल्या सांवत यांनी मनरेगा प्रकरणाची चौकशी करून बिले द्यावीत,यापुढे कोणताही गैरव्यवहार होऊ नये हा विषय लावून धरला होता.त्या व बनाळीतील राजकीय वर्चस्ववादातून हा हल्ला झाला असल्याचा आरोप कॉग्रेसने केला आहे.