उमदी,वार्ताहर :बालगांव (ता-जत) येथील सोसायटी सचिव सुधाकर पोतदार हे मनमानी कारभार करत असून त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी उपसरपंच सारवाड यांनी निवेदनाद्वारे केली.
उपसरपंच सारवाड यांनी याबाबतचे निवेदन सांगली जिल्हा बँक मुख्य कार्यालय व तालुका इन्स्पेक्टर यांच्याकडे दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की,सचिव पोतदार हे मनमानी कारभार करत असून ते सभासदाना व्यवस्थित माहिती न देत नाहीत, दमदाटी करतात व कर्जासाठी जे सभासद ज्यादा पैसे देतात अशाच लोकांची मध्यम व इतर कर्जाची यादी घालतात.कर्जाचा हिशोब देत नाहीत तसेच ते यापूर्वी देखील वादग्रस्त बनले होते. यासर्व प्रकाराची दखल घ्यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे.




