जत तालुक्यातील दोन जळीत घटनात 4 लाखाचे नुकसान कोसारीत प्रकल्पगस्ताचे घर जळाले;भिवर्गीत शेतकऱ्यांच्या घरास आग

0

जत,प्रतिनिधी ;साठवण तलावामुळे विस्थापित झालेल्या कोसारी (ता. जत)येथील रावसाहेब गंगाराम वायदंडे यांचे कुटुंब पुन्हा एकदा उघड्यावर आले आहे. सोमवारी सकाळी लागलेल्या अगीत वायदंडे यांचे छप्पर वजा घर व आतील सर्व संसारोपोगी साहित्य भस्सात झाले. तत सुमारे अडीच लाख रूपांचे नुकसान झालचा प्राथमिक अंदाज आहे.कोसारी येथे गावालगत साठवण तलाव झालने तलावाचे पाणी दलित वस्तीमध्ये घुसले आहे. त्यामुळे परिसरातील अनेक कुटुंबे आपली मुळ घरे सोडून गावाबाहेर गावठाण जागेत छप्पर धरून राहिले आहेत. तीन वर्षे उलटली तरीही त्या कुटुंबास शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही की, निवाऱ्याची सोय झाली नाही. त्या धील प्रकल्पगस्त रावसाहेब वायदंडे यांचे घरास सोमवारी सकाळी आग लागली.

वायदंडे यांच्या झोपडीवजा घरासमोरील चुली मधील ठिणगी मुळे घरास आग लागली. सर्व गवती छप्पर असलने व पुरेसे पाणी नसलने ही आग अटो्नात आली नाही. त्यांचे केरसूणी करणचा व्यवसाय असून सुमारे तीन हजार केरसूण्या धान्य, शेळ्या विकून आलेली रोख 40 हजार रूपांयाची,संसारोपोगी साहित्य आगीत भस्मसात झाले.या आगीत सुमारे अडीच लाखाचे नुकसान झालचा प्राथमिक अंदाज आहे. गावकामगार तलाठी गावात नसल्याने या दुर्घटनेचा पंचनामा करण्यात आला नाही. 

Rate Card

भिवर्गीत घराला आग लागून दीड लाखाचे नुकसान

संख,वार्ताहर: भिवर्गी खोतवस्ती (ता.जत) येथील शेतकरी गेनू सिध्दप्पा करे याचे शेतातील राहते पञ्याचे घरांला आग लागून भस्मसात झाले.आगीच्या जाळ्यांनी लगत बांधलेली काही जनावरे भाजली आहेत. आगीत दीड लाखाचे नुकसान झाले आहे.रविवारी सायंकाळी घटना घडली.

रविवारी सायंकाळी करे यांच्या कुंटूबातील सर्वजण शेतात कामासाठी गेली असताना घराला अचानक अाग लागली.बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केल्याने घर भस्मसात झाले.शेजारी बांधलेले काही जनावरे आगीत गंभीर भाजले आहेत.धान्ये,सोने नाणे,महत्वाची कागदपत्रे,संसारउपयोगी साहित्य आगीत जळाले आहे.आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.करे कुंटूबिये यामुळे उघड्यावर आले आहे.गावकामगार तलाठ्यांनी पंचनामा केला.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.