बालगांव ते जिगजेवणी (कर्नाटक हद्द) डांबरीकरण रस्त्याचे उध्दाटन

0
6

उमदी,वार्ताहर :जत तालुक्यातील रस्त्यांच्या व विकास कामांचा शुभारंभ तसेच भुमिपुजनाचा कार्यक्रम बालगांव हळ्ळी सोनलगी या गावात आमदार विलासराव जगताप यांचे हस्ते पार पडले. यामध्ये बालगांव येथे बालगांव ते जिगजेवणी (कर्नाटक हद्द) एक किमी डांबरीकरण रस्त्याचे उध्दाटन करण्यात आले. यासाठी वीस लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

तसेच हळ्ळी येथे जि. प. शाळेत नवीन वर्ग खोल्यासाठी सहा लाख मंजूर असलेल्या या कामाचा शुभारंभ झाला. उमदी ते सोनलगीकडे जाणाऱ्या रस्त्याचे एक किमी डांबरीकरण रस्त्याचे उध्दाटन करण्यात आले. यासाठी -पंचवीस लाख इतका निधी मंजूर आहेे.यावेळी शिक्षण सभापती तमन्नागौडा रवी पाटील उमदीचे भाजपा नेते संजय तेली अादि मान्यवर उपस्थित होते.

बालगाव ता.जत येथील विकासकामाच़्या उद्धाटन प्रसंगी आमदार विलासराव जगताप, तम्माणगौंडा रवी, संजयकुमार तेली आदि

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here