जत,प्रतिनिधी : येथील सिध्दिविनायक पतसंस्थेच्या प्रशासकीय नुतन कार्यालयाचे उद्धाटन कॉग्रेसचे जिल्हाध़्यक्ष मोहनराव कदम यांच्या हस्ते संपन्न झाले.जत शहरात नावारूपास आलेल्या या पतसंस्थेने अल्पावधीत नावलौकिंक मिळविला आहे. पारदर्शी कारभार करत व्यवसायिकांसह जनसामान्यांना अर्थरुपी मदत करत त्यांचा स्तर मजबूत करण्यासाठी या संस्थेकडून प्रयत्न व्हावेत.संस्थेचा आलेख सतत चढता रहावा,जतची अर्थ वाहिनी बनावी असे यावेळी आ. कदम यांनी शुभेच्छा देताना मनोगत व्यक्त केले. डफळापूरच्या दत्त पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा डोलारा उंचावत आहे. संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सदस्य,कर्मचा
यावेळी शहरध्यक्ष पृथ्वीराज पाटील, कॉग्रेस नेते तथा जिल्हा बँक संचालक विक्रमसिंह सांवत, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार,बाबासाहेब कोडक,नगराध्यक्ष शुंभागी बन्नेनावर,डफळापूर सोसायटीचे चेअरमन मनोहर भोसले,राजू भोसले, चेअरमन अजित भोसले,व्हा. चेअरमन प्रविण पाथरूट, अशोक सवदे,प.स.दिग्विजय चव्हाण,वैभव गायकवाड(चिंचणी)आदि मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचा डोलारा उंचविण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले दत्त पतसंस्थेचे चेअरमन तथा सिध्दिविनायक पतसंस्थेचे संस्थापक बाबासाहेब माळी यांचा सत्कार आ. मोहनराव कदम यांच्या हस्ते करण्यात आला. माळी यांच्या मार्गदर्शनाखाली दत्त सह सिध्दिविनायक पतसंस्थेचा नावलौकिक कायम आहे. अनेक गरजूनां कर्जरूपी मदतीचा हात देत त्यांना उभारण्याचे काम त्यांनी केले आहे. शिवाय दोन्ही पतसंस्थेच्या माध्यमातून पन्नासवर बेरोजगार तरूणांना रोजगार मिळवून दिला आहे. दोन्ही संस्थेच्या माध्यमातून सुमारे एक हाजार सभासदांना कर्जे वाटप करण्यात आली आहेत. स्वत: माळी कर्जे वसुली,संस्थेच्या कारभारवर लक्ष ठेवून असतात. त्यामुळे संस्थेला ‘अ’ वर्ग दर्जा स्थापनेपासून कायम आहे.
फोटो
जत येथील सिध्दिविनायक पतसंस्थेच्या प्रशासकीय कार्यालयाचे उद्धाटन आ. मोहनराव कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी गुलाबराव पाटील,विक्रमसिंह सांवत,दिग्विजय चव्हाण, बाबासाहेब माळी आदि मान्यवर उपस्थित होते. पतसंस्थेच्या वतीने आ. मोहनराव कदम यांचा चेअरमन अजित भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.उपस्थित अन्य मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला.









