अवैद्य वाळूसाठ्यावर छापा :सहा ट्रक पकडले

0

जत,प्रतिनिधी :  सोलापूर जिल्ह्यातून विनापरवाना वाळू उचलून जत मार्गे सांगली येथे जात असलेले सहा ट्रक तासिलदार अभिजित पाटील व त्यांच्या पकडत जप्त केले आहेत. ही कारवाई आज सकाळी महाराष्ट्र – कर्नाटक सिमेवर करण्यात आली.

        याबाबत अधिक माहिती अशी की , सोलापूर जिल्ह्यातून अवैधरित्या वाळू उपसा करून त्याची जत मार्गे सांगली परिसरात वाहतूक आणि विक्री करण्यासाठी सिमा भागात साठा करण्यात येत असल्याची माहिती तासिलदार पाटील यांना मिळाली होती. त्या माहितीनुसार तसिलदार अभिजित पाटील, नायब तहसीलदार संजय पवार यांनी उमदी पोलिसांची मदत घेवून अचानक छापा टाकत कारवाई केली आहे . सिमा भागात सुमारे 25 ते 30 ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला आहे. सदरची वाळू जप्त करत ताब्यात घेतली असून जप्त वाळू उमदी पोलिस स्टेशन परिसरात टाकण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आर.एच.कोरवार,नितीन कुंभार , लक्ष्मण भंवर,निखिल पाटील,बी.जे. पाटील,राहुल कोळी,अनिल हिप्परकर, पोलिस अधिकारी भगवान शिंदे यांनी कारवाईत भाग घेतला आहे .

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.