जत,प्रतिनिधी : जाणिवपुर्वक जतचा विकास होऊ नये म्हणून चुकीचे ठेकेदार उभे करून विकास कामे अडविण्याचे काम स्वंयघोषित नेत्यांनी केले आहे.अशा प्रवृत्तीना हाकला.जतच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन युवक कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी केले.ते नगरपालिका निवडणूकीतील कॉग्रेसच्या प्रचार सभेत ते बोलत होते.शहरातील थोरली वेस येथे सभा झाली.
श्री. कदम पुढे म्हणाले,80 गावात टँकर व दुष्काळी परिस्थिती असताना
पालकमंत्री फिरकले नाही. आता ते प्रभागात सभा घेत आहेत.त्यावेळी कुठे होते. त्यांचा पुळका कशासाठी आहे.हे ओंळखा.कॉग्रेसच्या उमेदवारीनी शहराचा विकास करण्याचा स्वच्छ प्रयत्न केलेत.जतच्या स्वंय घोषित नित्याना हाकलण्या अगोदर बाहेर पडल्याने कॉग्रेसचे शुध्दीकरण झाले. गेल्या पाच वर्षात विकास खुंटला आहे.रस्त्यावर खड्डा नाही,स्वच्छ व मुबलक पाणी येतयं असे वाटेल तेव्हा जतचा विकास झाला असे म्हणता येईल. ते काम कॉग्रेसचे उमेदवार करतील.भाजपचे फसव्या सरकारने साडेतीन वर्षात एकही आश्वासन पाळले नाही.असेही शेवटी कदम यांनी सांगितले.
कॉग्रेस नेते विक्रम सांवत म्हणाले,कुंटूबप्रमुख म्हणून गेल्या पंचवीस वर्षात जत शहराची बकाल आवस्था केली त्यांना बाजूला करा.ज्यांना जतची जाण नाही, अशा उमेदवारांना निवडून देऊ नका.जुन्या नव्याचे समिकरण जुळवून लोकमताचे अनुभवी व तरूण उमेदवार दिले आहेत.माझ्यावर विश्वास ठेवून गत निवडणूकीत यश दिले तसाच विश्वास देऊन कॉग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा.नाना शिंदे म्हणाले,नव्याने नगरपरिषद झाल्याने मुख्याधिकारी वगळता कोणतीही पदे शासनाने दिली नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायती सारखा कारभार करावा लागला. गत निवडणूकीत विरोधी पक्षाकडे सत्ता असल्याने शासनाने जाणूनबुजून निधी कमी दिला त्यामुळेही विकासाला मर्यादा पडली. भविष्यातील तीस वर्षाचा विचार करून व्हिजन घेऊन आम्ही कॉग्रेसचे सक्षम पँनेल उभे केले आहे.गेल्या दहा वर्षापासून प्रशासनातील जाण असलेल्या नगराध्यक्ष सह नगरसेवकांचे उमेदवार दिले आहेत.विरोधकाच्या घाणेरड्या राजकारणाला थारा न देता जतच्या विकासासाठी कॉग्रेस नेतृत्वावर विश्वास दाखवावा.इकबाल गंवडी म्हणाले,गत निवडणूकीत त्रिशंकू अवस्थेमुळे विकास साधता आला नाहीत. तरीही तीस कोटीची कामे केली. सोनेरी टोळी म्हणाऱ्यांनी जतच्या जनतेला लुटले आहे.आम्ही विकासकामे करणारी टोळी आहोत, म्हणून गेल्या पंचवीस वर्षापासून आम्हाला जनतेनी निवडून दिले.नावे ठेऊन स्वत:ची झोळी भरली.तालुकाध्यक्ष आप्पाराय बिराजदार, मोहन कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी पंचायत समितीचे गट नेते रविंद्र सांवत,माजी सभापती बाबासाहेब कोडक, नगरसेवक मुन्ना पखाली, महादेव कोळी,रविंद्र साळे,श्रींकात शिंदे, माया साळे,मनिषा साळे,निलेश बामणे,युवराज निकम,गणेश गिड्डे,प्रविण पाथरूट,सर्व उमेदवार उपस्थित होते.
फोटो
जत नगरपालिकेच्या प्रचारार्थ आयोजित कॉग्रेसच्या प्रचार बोलताना युवक प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम बाजूस जिल्हा बँक संचालक विक्रम सांवत व मान्यवर
Attachments area





