जत शहराच्या विकासासाठी भाजपला विजयी करा : आ. विलासराव जगताप

0

जत,प्रतिनिधी : जत शहराचा सर्वागिंन विकासासाठी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासंह सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करा असे आवाहन आ. विलासराव जगताप यांनी केले.

Rate Card

आ. जगताप पुढे म्हणाले, जत नगरपालिकेत भष्ट कारभाराने विकास खुंटला आहे. गटारी,स्वच्छचा,रस्ते,अपुरा पाणी पुरवठा,दिवाबत्ती अादि समस्याने जनता हैराण आहे. सत्ता असतानाही जिल्हा नियोजन मधून मोठा निधी मिळवून देऊनही भष्ट्र सत्ताधाऱ्यांनी विकास केला नाही. त्यातही कमिशन खाले. शहरातील हे बकाल पण बदलण्यासाठी भाजपचे पँनेल विजयी करा. आता पर्यत जिथ भाजपची सत्ता आली आहे.तेथे मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे, प्रगतीपथावर आहे. त्यामुळे जतच्या विकासाला गतिमान करण्याची वेळ आता आली आहे. ते काम भाजप सरकारचं करेल.शासनाकडून निधी आणून जतला सुंदर शहर बनवू. आमचे सर्व उमेदवार विकास कामे करण्यासाठी सक्षम आहेत.त्यामुळे बहुमताने विजयी करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.