यंदा जत पालिकेवर राष्ट्रवादी कॉग्रेसचीच सत्ता ; सुरेश शिंदे

0
4

जत,प्रतिनिधी : जत नगरपालिकेच्या निवडणूकीचे आमच्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या सर्व उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे यंदा नगराध्यक्षासह पालिकेवर बहुमताने सत्ता असेल असे प्रतिपादन माजी सभापती सुरेश शिंदे यांनी केले. ते प्रभाग 1 मधील विठ्ठलनगर येथील कोपरा सभेत बोलत होते.

शिंदे पुढे म्हणाले,आम्ही निषकंलक,चारिञ्यवान उमेदवार दिले आहेत.सर्वच प्रभागात मोठ्या प्रमाणात आम्हाला पांठिबा मिळत आहे. जत शहराला भकास करून विकासापासून वचिंत ठेवणाऱ्यांना यावेळी जनता घरी बसविणार आहे. प्रभाग 1 मधील विठ्ठल नगर परिसराची सत्ताधारी मंडळीनी दुर्दशा केली आहे. परिसरातील गटारीची आवस्था भहवाह आहे. महिलांना शौच्छालयाची व्यवस्था नाही.परिसरातील पाणी पुरवठा व्यवस्थेमुळे कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची पळापळ होते.अंतर्गत रस्ते दयनीय बनले आहेत. सत्ताधाऱ्यांनी विकासापासून वचिंत ठेवणाऱ्यांना या प्रभागात विकास पर्व आणण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या शबाना इनामदार व प्रभागाच्या आप्पासाहेब पवार,वनिता साळे यांना बहुमताने विजयी करा. जत नगरपालिकेच्या विकासाचे व्हिजन घेऊन आम्ही निवडणूकीत उतरलो आहोत. भष्ट्र नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी गेल्या पाच वर्षात जतच्या जनतेला वेटिस धरले आहे. रस्ते,स्वच्छ पाणी,स्वच्छता,गटारी ,दिवाबत्ती या समस्या सोडविण्यातही सत्ताधारी मंडळीनी दुर्लक्ष केल्यांने नागरिकांना मोठ्या असुविधेला तोंड द्यावे लागले आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात तीव्र असंतोष उसळला आहे.त्यामुळे आमच्या सर्व उमेदवारांना मोठा पांठिबा मिळत आहे. 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here