उमदी येथे फलपिच क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

0

उमदी,वार्ताहर ; संघर्षातून मिळते तेच टिकते, यासाठी तरुणानी मन केंद्रित ठेवून संघर्ष केल्यास यश नक्की मिळते.त्यामुळे तरूणानी नेहमी संघर्ष करावा, यश मिळतेच असे आवाहन सांगलीचे अप्पर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण यांनी केले.ते उमदी येथे बाळासाहेब माने फाऊंडेशनच्या वतीने आयोजित पारितोषिक वितरण संभारंभात बोलत होते.यावेळी जत उपविभागीय पोलीस अधिकारी नागनाथ वाकुडे,मुंबई शहर उपजिल्हाधिकारी व उमदी गावचे सुपुत्र मल्लिकार्जुन माने,उमदीचे पोलिस उपनिरिक्षक प्रवीण संपागे,विजापूरचे राजलक्ष्मी कट्टीमनी आदि मान्यवर उपस्थित होते.

     उमदी येथील बाळासाहेब माने फाऊंडेशनच्या वतीने 25 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत फुलपिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेल्या या क्रिकेट स्पर्धेचा मंगळवारी अंतिम सामना थरारक झाला.शेवटच्या दिवशी सनमडी विरुध्द मंद्रुप संघात अंतिम सामना झाला. यात सनमडी संघाने बाजी मारली.ते प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.प्रथम क्रमांकाचे बक्षीस 33,333 रु व सन्मान चिन्ह सनमडी क्रिकेट संघाला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस  22,222 रु सन्मान चिन्ह  मंद्रुप क्रिकेट संघाला व तृतिय बक्षीस 11,111 रु सन्मान चिन्ह सलगर क्रिकेट संघास देण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.घनशाम चौगुले यांनी केले.प्रास्ताविक अध्यक्षा प्रचिती माने यांनी केले, तर आभार लखन माने यांनी मांडले.

 चौकट मध्ये

Rate Card

 यावेळी बालगांव येथील मळसिध्द कांबळे यांचे घर जळाल्याने त्यांचे संपूर्ण कुटूंब उघड्यावर आले होतेे. त्याला मदत म्हणून बाळासाहेब माने फाऊंडेशनच्या वतीने संसार उपयोगी साहित्य देण्यात आले. महाराष्ट्राचा महावक्ता या वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेऊन दूसरा क्रमांक पटाकावलेले कु.आनंद कांबळे यांचा देखील सत्कार करण्यात आला. विटी दांडु स्पर्धेत राज्यात प्रथम आलेल्या संघास व मार्गदर्शन करणाऱ्या कांचणकुमार उबंरजे व वाली सर या शिक्षकांचा सत्कार करुन गौरविण्यात आले.

फोटो

उमदी (ता.जत)येथे क्रिकेट स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना पारितोषिक वितरण करताना अप्पर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण. डिवायएसपी नागनाथ वाकुडे ,मुंबई शहर उपजिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, पोलिस उपनिरिक्षक प्रवीण संपागे, प्रचिती माने आदि मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.