जत,प्रतिनिधी : जत शहरातील किंगमेकर नेते माजी सभापती सुरेश शिंदे यांनी गेल्या दोन तपाहून जास्त काळ जत शहरावर आपली पकड मजबूत ठेवत जत शहर कुंटुब म्हणून राजकारण केले. जिल्ह्यातील ताकतवान नेते म्हणून त्यांना जत सह तालुक्यातील जनतेनी मोठी ताकत दिली. जनतेचे उत्तरदायित्व पुुुुर्ण करताना शिंदे कधीही मागे हटले नाहीत.जत शहरातील जनतेच्या प्रश्नासाठी ते कायम पोटतिडकीने भूमिका घेतात. शहर माझं कुंटुब आहे. मी त्यातला एक सदस्य आहे. कुटूंबियांची जबाबदारी म्हणून मी सतत त्यांच्या प्रश्नासाठी झटत आहे.त्यामुळे शहरात सुरेश शिंदे बाहुबली नेते बनले आहेत.मोठ जनाधार
त्यांचा पाठिशी आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून त्याचे शहरावर निर्विवाद वर्चस्व आहे.त्यांना शहरातील जनतेनी भरभरून साथ दिली आहे.तितक्याच विश्वासाने त्यांनी जत शहरातील प्रश्न मार्गी लावले आहेत. जत शहरातील आश्वासक नेते म्हणून त्यांच्या भोवती जनतेचे कायम वर्तुळ असते.पंचवीस वर्षापासून शहरात जनतेच्या प्रश्नासाठी सतत उपलब्धं व थेट संपर्कात असणारे “आपला माणूस” म्हणून सुरेश शिंदे परिचित आहेत. त्यामुळे मोठे जनमत त्यांच्या पाठिशी असते. त्यांना विरोधकांनी अनेक वेळा घेरूनही जत शहराचं सत्ता केंद्र आबाधित ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्याच ताकतीने ते यावेळी नगरपालिकेत सत्ता मिळवायची म्हणून मैदानात उतरले आहेत.
या निवडणूकीत त्यांना त्यांचे चिरजींव स्वप्निल शिंदे यांची मोठी मदत मिळणार आहेत. जनमताच्या नेत्यांचे चिरजींव व राजकीय बाळकांडू घरातून मिळालेले स्वप्निल हे वडीलाच्या सोबत राजकीय आखाड्यात या निवडणूकीतून उतरत आहेत. कायद्याचे शिक्षण घेत असलेले युवा संघटक म्हणून स्वप्निल शहरात परिचित आहेत. वडीला प्रमाणे शहराला कुंटुब मानत त्यांचे काम सुरू आहे. अनेक राजकीय घडामोडी जवळून अनुभवलेले स्वप्निल भविष़्यात शहराचे ताकतवन नेते म्हणून समोर येणार आहे.राजकीय वारसा पेक्षा स्व:कृत्वांवर जनहित पाहणारे स्वप्निल युवकांबरोबर वृध्दांचे आधार ठरले आहेत.शहरातील जनतेचे आपलेपण असणाऱ्या शिंदे कुंटूबाचे वलयं कायम राखण्याची जबाबदारी यापुढे स्वप्निल यांच्या वर असणार आहे. त्यांचीच रंगीत तालिम म्हणून नगरपालिका निवडणूकीच्या निमित्ताने मैदानात उतरले आहेत.
युवकांचे संघटन वडील बरोबर जनतेशी नाळ जोडलेले स्वप्निल शहरातील चर्चेत चेहरा म्हणून समोर आले आहेत.प्रभाग क्र.7 मैदानात उतरलेले स्वप्निल यांना मोठा जनाधार मिळत आहे. त्यामुळे त्यांचा विजय किंबहुना राष्ट्रवादी कॉग्रेस पँनेलचा बहुमताने नगरपालिकेत विजय निश्चित असल्याचा दावा त्यांच्या समर्थंकानी व्यक्त केला.
राष्ट्रवादी कॉग्रेसच्या सर्वात प्रथम उमेदवारी घोषित करून शिंदे यांनी आघाडी घेतली आहे. जनमताच्या जोरावर ते यावेळीही नगरपालिकेचे मैदान मारणार हे निश्चित आहे. शहरातील राजकीय सारीपाटावर वजीर असणारे शिंदे नगरपालिका निवडणूकीत बहुमताने नगराध्यक्ष सह सत्ता मिळवत किंगमेकर म्हणून पुन्हा नव्याने समोर येतिल असा दावा त्यांच्या समर्थंकानी केला आहे.
चौकट
जत ग्रामपंचायत असताना 1982-87 या कालावधीत सुरेश शिंदे संरपच होते. शहरातील त्यांची ती शेवटची निवडणूक ठरली. त्यानंतर त्यांनी शहरातील किंगमेकर म्हणून भूमिका निभावली. अनेक फाटक्या,सामान्य कार्यकर्त्याना सन्मानाची पदे देत ताकत दिली. तब्बल तीस वर्षात आपल्या घराण्यातील एकही उमेदवार आणला नाही. राजकारणातील वेगळं रसायन असलेले सुरेश शिंदे यांचा झंझावत त्यामुळे कायम आहे, हे विशेष….
तीस वर्षानंतर यंदा राजकारणात आलेले त्यांचे चिरजींव यांना कोणताही आपल्या राजकीय प्रतिष्ठेचा वापर न करता थेट जनतेच्या दरबारात राजकीय भवितव्य आजमावण्याचा सल्ला देत नगरसेवक पदासाठी निवडूकीत उतरविले आहे.
त्यांनी ठरविले असते तर स्वप्निल यापुर्वीच नगरसेवक झाले असते. राजकारण करत असताना जनता प्रमाण मानणारे सुरेश शिंदे यांनी राजकारणात घालून दिलेला हा आदर्श वाखण्याजोगा आहे.