जत,प्रतिनिधी : राष्ट्रवादी कॉग्रेस व भाजपच्या सक्षम उमेदवारीने कॉग्रेस कडून नवी समिकरणे पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्राथमिक मजबूत स्थितितील कॉग्रेस नेत्याकडून उमेदवार घोषित करण्यास विलबं होत आहे. ग्रामपंचायत निवडीतील मोठ्या यशामुळे विश्वास दुंनावलेले कॉग्रेस नेते नगरपालिकेच्या निवडणूकीत मोठा विजय मिळविण्यासाठी सक्रीय झाले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉग्रेस व भाजपकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार घोषित करून आवाहन उभे केल्याने कॉग्रेसकडून अनेक शक्यता पडताळून पाहण्यात येत आहेत. इच्छूंक उमेदवारासह अन्य काही चेहरे पुढे येण्याची शक्यता आहे. स्थानिक नेत्यांशी चर्चा करून यादी मुंबईला पाठविण्यात आल्याचे कळते. तेथून शिक्कामोर्तब झाल्यानंतर अंतिम यादी घोषीत होणार आहे. आज किंवा उद्या यादी घोषीत केली जाईल असे कॉग्रेस नेत्याकडून सांगण्यात आले.
येथे प्रथमच नगराध्यक्षपदाची थेट निवडणूक होत आहे. नगराध्यक्षपदाचे मैदान कोण मारणार, याची चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादीने सर्वात आधी नगराध्यक्षपदासाठी शबाना इनामदार यांच्या नावाची घोषणा केली. भाजपनेही डॉ. रेणुका अरळी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
पहिले नगराध्यक्षपद अनुसूचित जाती, दुसरे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव होते तर तिसरे नगराध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव आहे.
निवडणुकीचे पडघम झडू लागताच लढतीचे चित्रही अंतिम होत आहे. शहरातील रस्ते, गटारी, वाहतूक समस्या, पाणीटंचाई, विकासात झालेली पिछेहाट याचबरोबर भ्रष्ट कारभार, श्री यल्लम्मादेवीच्या आरक्षित जागेची विक्री,राजकीय हेवेदावे याच मुद्यावर निवडणूक लढविली जाणार आहे. निर्यायक वेळी सुरेश शिंदे यांची खेळी,भाजपकडून दिलेला नगराध्यक्ष पदाचा सक्षम उमेदवार डॉ.रेणुका आरळी महत्वपुर्ण ठरणार आहे.बदललेल्या राजकीय घडामोडीवर स्थित्ततंरे बदलत आहेत. अर्ज माघारीपर्यत अनेक घडामोडी घडणार आहेत.राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेस असा तिहेरी सामना होत आहे. पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. उमेदवारी व नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे उमेदवार कामाला लागले आहेत. भाजपची उमेदवार यादी तयार आहे. काँग्रेसच्या गोटात मात्र अद्यापही संभ्रमाचे वातावरण आहे.उमेदवारी घोषित होण्या अगोदर शोशल मिडिया चर्चेला ऊत आला आहे. अनेक उमेदवार मिळतील म्हणून खुशीत आहेत. काहीची नाराजी दूर करण्याची मोठी कसरत पक्षश्रेष्ठीना करावी लागणार आहे.सर्वच पक्षांकडून उमेदवारी देताना अनेक गणिते जुळविली जात आहेत. राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदासाठी शबाना राजू इनामदार यांच्या नावाची घोषणा केली. नव्या चेहर्यांना संधी देतानाच एकगठ्ठा मतदान असणाऱ्या मुस्लिम समाजाला उमेदवारी देऊन माजी सभापती सुरेश शिंदे यांनी अनेकांच्या बेल्स उडविल्या आहेत. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रविंद्र अरळी यांच्या पत्नी डॉ. रेणुका अरळी यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी पुढे केले आहे. आमदार विलासराव जगताप यांच्याकडे अन्य उमेदवारांची यादी तयार असल्याचे सांगण्यात येते.यावेळी नगरपालिकेत भाजपचा पहिला नगराध्यक्ष निवडून आणायचा चंग आ.जगताप यांनी बांधला आहे. प्रत्यक्षात कोन राजा,कोन वजीर व कोन प्यादे याचे चित्र मतदार ठरणार आहेत.