जत पश्चिम भागातील अवैद्य धंद्यात वाढ मटका,जुगार,चंदन तस्करी,बेकायदा दारूची राजरोसपणे विक्री ; अभय पोलिस अधिकाऱ्यांचेच

0
7

डफळापूर, प्रतिनिधी : डफळापूर सह पश्चिम भागातील बाज,अंकले,बेंळूखी, डोर्ली, कुडणूर,शिंगणापूर,जिरग्याळ, खलाटी गावात बेकायदा दारू खुलेआम विक्री होत आहे. मटका,चंदन तस्करी,गांजा,जूगार राजरोसपणे सुरू आहेत. सर्वप्रकार सर्वज्ञात असताना याकडे पोलिस यंत्रणेचे अर्थपुर्ण सहयोग व अधिकाऱ्यांचे अभय यामुळेच अवैद्य धंदे फोफावल्याचे आरोप होत आहेत.

पश्चिम भागातील बाज,डफळापूर वगळता अन्य गावात कोणतेही अवैद्य धंदे नव्हते. मात्र गत चार महिन्यात प्रत्येक गावात दारू,मटका,जूगार,गांजाची शेत होत असल्याची चर्चा आहे. पोलिस अधिकाऱ्यांशी संबधित असणारे काही स्थानिक लोकांनी बंळ दिल्याने अवैद्य धंदे वाढले आहेत. 

डफळापूरात वाढलेले अवेद्य धंदे बंद करा म्हणून आरपीआय कडून थेट महानिरिक्षक नांगरेपाटील यांच्या पर्यत निवेदनेही दिली आहेत. तरीही अवैद्य धंदे बंद होत नाहीत. हे विशेष..

डफळापूर भागात चालू अवैद्य धंद्यांना यंत्रणेचे बंळ असल्याने असे प्रकार वाढले आहेत.डफळापूर सह पश्चिम भागातील अवैद्य धंदे पोलिसांच्या अर्थपुर्ण सहयोगाने सुरू आहेत. त्यांचेच अभय आहे. त्यामुळे अनेक संसार उद्धवस्त होत आहेत. त्यामुळे तातडीने अवैद्य धंदे बंद करावेत अन्यथा तीव्र अंदोलन करावे असे सांगण्यात आले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here