दानम्मादेवी कार्तिक दिपोत्सव आणि पालखी सोहळा उत्साहत संपन्न

0

 माडग्याळ,वार्ताहर;गुड्डापूर (ता.जत) येथे श्री. दान्नम्मादेवीच्या यात्रेच्या


 दुसऱ्या दिवशी कार्तिक दिपोत्सव आणि पालखी उत्सवास सुमारे 5


 लाख भाविकभक्तांच्या उपस्थितात पार पडला. कार्तिक दिपोत्सव व

पालखी उत्सव राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालक


 मंत्री सुभाष देशमुख यांच्या अमृतहस्ते करण्यात आला.श्री. क्षेत्र गुड्डापूर येथे दरवर्षी कार्तिक यात्रा भरविली जाते. या यात्रेस महाराष्ट्र, कर्नाटक तसेच अन्य राज्यातून मोठ्या संखेने भाविकभक्त दानम्मादेवीच्या दर्शनासाठी हजेरी लावीत असतात. शुक्रवार पर्यंत सुमारे 5 लाख भक्तांनी देवीचे दर्शन घेतले. यात्रेत महत्वाचे मानले जाणारे कार्तिक दिपोत्सव आणि पालखी समारंभासाठी विशेष गर्दी असते. यावर्षी हा कार्यक्रम पालकमंत्री सुभाष देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्ह्याचे खासदार संजयकाका पाटील, मिरजचे आमदार सुरेश खाडे, जत तालुक्याचे आमदार विलासराव जगताप, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख,डॉ.रविंद्र आरळी,जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती तम्मानगौडा रविपाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

      

Rate Card

 यावेळी देवस्थान ट्रस्ट कडून देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना


 खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या त्रासाला काही उपाययोजना करण्याची मागणी


 केली. याबाबत बोलताना पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी गुड्डापूरला


 येणारे सर्व मार्ग लवकरात लवकर दुरूस्थी करण्याचे आश्वासन दिले.


 येणाऱ्या काळात रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय, तसेच वीजयाची पूर्तता करण्याचे यावेळी त्यांनी आश्वासन दिले.खासदार संजय पाटील यांनी देवीस आलेल्या भाविकांना यात्रेच्या सुभेच्छा देताना देवी भक्तांना शुभाशिर्वाद देवो अशी देवीच्या चरणी पार्थना केली. देवीच्या आशीर्वादाने मि खासदार झालो असल्याने  व आमच्या हातून देवीची सेवा घडावी हि आमचे नशीब असल्याचे बोलून दाखविले. भविष्यात गुड्डापूर मधील रस्ते असोत वा पिण्याचे पाणी हे प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

फोटो

गुड्डापूर येथे दानम्मादेवी कार्तिक दिपोत्सव आणि पालखी सोहळा उत्साहत संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख, खा.संजय पाटील,आ.विलासराव जगताप,सुरेश खाडे,

जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.