पत्रकाराचीच दुचाकी चोरीला तपास सुरू आहेच्या पुढे कारवाई सरकेना ;शहरात पंचवीस वर दुचाकी लांबविल्या

0
9

जत,प्रतिनिधी : जत शहरातील चोरट्याची नंगानाच चालू केला आहे. गेल्या महिन्यात सुमारे वीस दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घटल्या आहेत. नुकतीच जत शहरातील मध्यवर्ती बँक ऑफ महाराष्ट्र समोरील डफळे वाड्यात राहणाऱ्या पत्रकार विश्वनाथ तळसंगी याच्या घरासमोरील लावलेली होंडा युनिकार्न (एम-10,सीसी-2179)नंबरची आंशी हाजार किंमतीचा गाडी चोरट्यांनी गुरूवारी रात्री पळविली. पहाटेच्या सुमारास हा प्रकार झाल्याचे तळसंगी यांनी सांगितले. शहरातील छोट्या घटना मोठे रुप घेत आहेत. जत शहरात बेबंदपणे सुरू असलेल्या अनेद्य धंद्यात तोट्यात आलेले अनेक तरूण चोऱ्या,वाटमारी,लुटमाराच्या नादी लागल्याने अशा चोऱ्याच्या वाढल्या आहेत.गेल्या महिन्यात दुचाकी चोरीच्या तक्रारी दाखल होऊनही चोरीचा छडा न लागल्याने आता दररोज एकादी दुचाकी चोरीला जात आहेत. तसेच शहरात लुटमारही जोरात सुरू अाहे. आठवडा बाजार,स्टँड परिसर,गजबलेले चौक चौरट्याच्या केंद्र स्थानी आले आहेत. शहरात नित्यांने अशा घटना होत असताना पोलिस प्रशासन तपास चालू आहेच़्या पुढे सरकले नसल्याचे आरोप होत आहेत. यात जिल्हा पोलिस प्रमुखांनी लक्ष घालण्याची गरज आहे. शहरात पोलिस ठाणे,गस्तीची गाडी फिरत असतानाही चोऱ्या होतातच कशा असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here