आता सांगा ! अंत्यसंस्कार करणार कुठे?
जत तालूक्यातील अनेक गावातील चित्र : भर पाऊसात अंत्यसंस्कार
जत- का. प्रतिनिधी: मान्सूच्या पाऊसाने सुरूवात केली आहे. त्या पाश्वभुमीवर जत तालूक्यातील अनेक गावातील स्मशान भुमीच्या शेडचा प्रश्ऩ ऐरणीवर आला आहे. भर पाऊसात अनेक गावात अत्यसंस्कार उरकावे लागत आहेत. तर जत तालूक्यातील निम्यावर गावात स्मशान भूमीला राखीव जागाच नसल्याचे वास्तव चित्र आहे. त्यामुळे अशा गावातील नागरिक ओड्याकडे किंवा शेतीच्या बांधावर अत्यसंस्कार करतात. नागरिकानी मागणी करूनही संबधित ग्रांमपचायती,तालुकास्तरीय विभाग लक्ष देत नसल्याने मरणानंतही मृतदेहाना यातना सहन कराव्या लागत आहेत. मानवी जीवनाच्या अंतीम वेळेतरी पार्थिवावर पाऊस,उन्हापासून संरक्षण राहायल पाहिजे, पण जत तालूक्यातील अनेक गावातील स्मशान घाटातील शेड कोसळल्याने किंवा शेडच नसल्याने भर पाऊसात अंत्यसंस्कार विधी करायचा कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळा सुरु असतांना या समस्येत अधिक वाढ झाली आहे.
अनेक गावातील छत उडालेले स्मशान घाट शेड अनेक दिवसांपासून लोंबकळत आहेत.अवकाळी पाऊस व वादळामुळे अनेक गावातील शेडला अवकळा आल्या आहेत. अशा स्मशानघाट शेडच्या दुरूस्थी संदर्भात व अनेक ग्रामपंचायतीने संबंधित विभाग व शासनाकडे वारंवार नवीन स्मशानघाटविषयी मागण्या केल्या आहेत. अनेक वर्षापासून नाकर्त्या प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. नवीन स्मशानघाट शेड न झाल्यास अंत्यसंस्कारासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. शासन कित्येक योजनेवर पैसा खर्च करते पण त्याचा कधीही पाठपुरावा करत नाही पण निदान या कामासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. जीवन जगताना अनेक नागरिकाना अनेक वेळा यातना भोगाव्या लागतात. किमान मरणानंतही यातना नसाव्यात. स्मशान भुमी म्हणजे निरवं शांततेचे ठिकाण संबोधले जाते. अगदी स्मशानातच शिवाचे स्थान असल्याचे मानले जाते.तेथेतर किमान अडचणी होऊ नयेत यासाठी संबधित विभागाकडून प्रयत्न व्हावेत अशी मागणी आहे.अनेक गावातून स्मशान घाटासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार केल्याचे अनेक गावातील पदाधिकारी सांगतात मात्र काहीही फायदा झाला नाही. शासनाने याकडे लक्ष द्यावे





