फायबर केबलने केले,अनेक विभागाचे कल्याण चरीचा प्रंचड त्रास नागरिकाना, चरीचे खड्डे अपघाताला आंमत्रण

0

फायबर केबलने केले,अनेक विभागाचे कल्याण

चरीचा प्रंचड त्रास नागरिकाना, चरीचे खड्डे अपघाताला आंमत्रण

जत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील अनेक गावे व जत शहरातील विविध भागातून एका मोबाईल कंपनीने ऑप्टिकल फायबर केबलसाठी (ओएफसी) सुमारे पंचवीस किलोमीटरची चर खोदाई केली आहे. जतसारख्या दुष्काळी भागात आधुनिकीकरणाच्या
नावाखाली मनमानी कारभार सुरू आहे.त्याला सर्वच विभागाचा आर्शिवाद आहे.
जत शहरासह तालुक्यातील  अनेक मार्गाच्या कडेने व अनेक गाव भागातून या चरीचे खोदकाम करण्यात आले आहे.अनेक ठिकाणी चरी खोदलेल्या ठिकाणी नाला बनल्यात,तर काही ठिकाणी मोठे ढिगारे धोकादायक बनले आहेत.बांधकाम विभागाकडून अर्थपुर्ण अभय असल्याने गेल्या महिन्यापासून या फायबर केबल ठेकेदाराने मनमानी  करत कोठेही चरी पाडल्यात,कशाही मुजविल्याने व जत शहरातील मुख्य विजापुर-गुहाघर मार्गावर मातीचे ढिगारे तसेच ठेवल्याने अपघाताला निमंत्रण बनत आहेत.तर पावसाने या चरीच्या ठिकाणी मुत्यूला आमत्रंंण देणारे खड्डे बनलेत. शहरात अनेक मार्गावर काढलेल्या चरीची अशी आवस्था बनली आहे.प्रत्येक गाव भागातून जाणाऱ्या केबलसाठी संबधित पदाधिकारी व ग्रामपंचायतीला लाखोचा निधी दिलायं,रस्त्याच्या तोडफोडीसाठी बांधकाम विभागाला पंचवीस लाखावर नुकसान भरपाई  व अधिकाऱ्याना वेगळी भरपाई दिल्याची चर्चा आहे.परिणामी या चरीमुळे नित्याचे अपघात होत आहे.अनेक नव्याने केलेले रस्त्याची तोडफोड करूनही बांधकाम विभागाचे हाताची घडी व तोंडावर बोट अशी भूमिकेत आहे.जत शहरातील स्टँड नजिक चर पाडलेल्या ठिकाणी टाकलेला भराव खचल्याने मोठा खड्डा मुत्यूचा सापळा बनला आहे. तो गेल्या दोन महिन्यापासून तशाच आहे.

Rate Card

फोटो

जत शहरातील स्टँड समोर पाडलेल्या चरीचा भराव खचल्याने पडलेला खड्डा कुणा जिव घेईल यांचा नेम नाही

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.