अधिवेशनात आवाज, गावागावांतही विकास!
जतच्या विकासासाठी तिन वर्षात 900 कोटीचा निधी आणला : आ. विलासराव जगताप
जत – आमदार विलासराव जगताप यांनी मागील तीन वर्षांत जतसह मतदारसंघातील जनतेच्या जिव्हाळ्याचे अनेक प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केले. बहुतांश प्रश्नांवर सरकारने कार्यवाही केली, तर काही प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. सध्याच्या सरकारच्या कार्यकाळातील पहिल्या दोन वर्षांचा विकासकामांवर 100 टक्के आमदार निधी खर्च झाला आहे. चालू वर्षातील निधीतून कामे सुरू आहेत. निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनाप्रमाणे म्हैशाळला मोठा निधी आणून कामे सुरू केली आहेत. पुढच्या सहा महिन्यात मोठे क्षेत्र ओलिताखाली येईल,कर्नाटकातील पाणी योजनेसाठी दोन राज्यातील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठक सुरू आहेत. कर्नाटकला तीन टीएमसी जादा पाणी देऊन या योजनेतून जत पुर्व भागातील 42 गावांना पाणी आणावयाच्या योजनेचा पाठपुरावा सुरू आहे. शिवाय जत तालुक्यातील रस्ते,जलसंधारण,जिल्हा नियोजन,नाबार्ड,विशेष दुरूस्थी, विडपॉवर,मुख्यमंत्री ग्रामसडक योजना,पंचायत समिती, राष्ट्रीय महामार्ग आदि योजनासाठी राज्य,केंद्र शासनाकडून तिन वर्षात सुमारे 900 कोटीचा निधी जत तालुक्यात आणल्याचा दावा आमदार विलासराव जगताप यांनी केला. पाण्यासह 80 टक्क्यांहून अधिक आश्वासने मार्गी लावण्याचा त्यांचा दावा आहे.
आमदार जगतापानी कृष्णेचे पाणी म्हैशाळ व नव्याने होऊ घातलेल्या कर्नाटकातील योजनेतून पाणी मतदारसंघाच्या शेवटच्या टोकापर्यंत आणि शेताच्या बांधापर्यंत नेण्याचे आश्वासन दिले होते. या पाणी योजनेतील बहुतांश भागात पोचविण्यात त्यांना यश आले आहे. गावागावांतील ओढे, नाले अडवून, बंधारे बांधून जलसंधारण कामे करण्याचेही त्यांनी अश्वासन दिले होते. मतदारसंघात आजपर्यंत शेकडो बंधारे झालेत. गावागावांत अंतर्गत तसेच बाह्य रस्त्यांची कामेही सुरू आहेत. एकाचवेळी 50 वर गावांतील अंतर्गत रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत. जत तालुक्याला वरदान ठरणाऱ्या म्हैशाळ योजनेचे जादा पाणी जतला द्यावे यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आहे. त्यात ते काही प्रमाणात यशस्वी झालेत. शिवा़य योजनेला मोठा निधी आणू कामे गतीने सुरू केली आहेत. त्यात प्रामुख्याने अंकले, खलाटी पंपहाऊस,कँनाल,त्यावरील पुलाची कामे गतीने सुरू आहेत. पुढील सहा महिन्यात बिंळूर हद्दीतील ओठापात्रे पाणी पोहचविण्याचा त्यांचा मानस आहे.जतचा महत्त्वाचा आसणाऱ्यां तालुका विभाजनासाठी त्याचा सतत पाठपुरावा सुरू आहे. त्याला प्राथमिक यश आले आहे. त्यामुळे जतचा महसूली भार कमी करण्यासाठी शासनाने संख येथे अप्पर तहसिल कार्यालय मंजूर केले आहे. तेथे येत्या काही दिवसात कार्यालय सुरू होणार आहे.जतच्या विविध विषयावर त्यांनी अधिवेशनात आवाज उटविला आहे.
तिन वर्षात झालेली कामे
रस्ते :
जिल्हा नियोजन, नाबार्ड, विशेष दुरूस्थी, बजेट,नँशनल हायवे,विड पॉवर,15/25 फंड,खासदार, आमदार फंड,दलित वस्ती सुधारणा आदि योजनातून 100 कोटीचा निधी आणून कामे केली आहेत, प्रगतीपथावर आहेत.मुख्यमंत्री सडक योजनेतून वीस कोटीचा निधी जत तालुक्यातील रस्ते कामासाठी आणला आहे.
पाणी योजना :
म्हैशाळ योजनेला 67 कोटीचा फंड मिळाला आहे, त्यात खलाटी, अंकले पंपहाऊस, कालवे,पुलाची कामे सुरू आहेत.पुर्व भागातील42 गावच्या पाणी योजनेसाठी पाठपुरावा सुरू आहे. लवकरच दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांची बैठक होऊन योजना आकारास येणार आहे.
पंचायत समितीच्या माध्यमातून :
दलित सुधार योजना,अल्पसंख्याक योजना,नागरी सुविधा, जनसुविधा,तिर्थक्षेत्र विकास,योजनेतून 20 कोटीचा निधी मिळाला आहे, कामे झाली आहे,काही प्रगतीपथावर आहेत.
जलसंपदा,जलसंधारण :
जलसंधारणांचे महत्व ओळखूंन जत तालुक्यातील ओढापात्रावर बंधारे बांधकाम,दुरूस्थी, व अन्य विकास कामासाठी सुमारे 35 कोटीचा निधी आणून कामे केली आहेत.
राष्ट्रीय महामार्ग :जत तालुक्यातून जाणाऱ्या गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गाला दोन टप्प्यात 620 कोटीचा निधी आणला आहे. त्याचे टेंडर निघून प्रत्यक्षात कामास सुरूवात झाली आहे.
नियोजित कामे :
म्हैशाळ योजनेचे पाणी तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोचविणार, मोठ्या जत तालुक्याचे विभाजन करण्यासाठी पाठपुरावा, विधानसभा मतदारसंघात नव्याने सिमेंट बंधारे उभारणी करण्यासाठी सरकारकडे निधीसाठी पाठपुरावा,मतदारसंघातील बहुतांशी गावांच्या बाह्य तसेच अंतर्गत रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी सरकारकडे मागणी
पावसाचे वाहून जाणारे पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे जतला मिळविण्यासाठी पाठपुरावा, उर्वरित योजनेच्या कामाला गती आणण्यासाठी निधीसाठी पाठपुरावा. विकास कामे वेगाने होण्यासाठी प्रयत्न,बंधारे, रस्ते, पाणी योजनांची कामे मार्गी लावणार
जत तालुक्यातील विकास प्रवाहात आणण्यासाठी महत्वपुर्ण असणाऱ्या पलूस-कुंडल-शिरढोण-कवठेमहाकांळ -जत- वळसंग- सोर्डी- आंसगी जत-संख-तिकोंडी – एतनांळ – विजापूर राष्ट्रीय महामार्ग करण्यासाठी पाठपुरावा करून मार्ग करणार





