लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33 % आरक्षण मिळालेच पाहिजे –श्रीमती शैलजाभाभी पाटील

0
6

लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33 आरक्षण

मिळालेच पाहिजे –श्रीमती शैलजाभाभी पाटील

सांगली;(प्रतिनिधी) –

          देशाच्‍या लोकसंखेमध्‍ये महिलांचा निम्‍माहिस्‍सा आणि विविध क्षेत्रामध्‍ये महिलांनी केलेली उल्‍लेखनीय  प्रगतीचा विचार करता त्‍यांना अजुनही प्रतिनिधीत्‍व मिळत नाही. त्‍यामुळे लोकसभा आणि विधानसभा मध्‍ये महिलांना 33 आरक्षण मिळालेच पाहिजे असे मागणी  महाराष्‍ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्‍या उपाध्‍यक्षा श्रीमती शैलजाभाभी पाटील यांनी केली. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्‍हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांचे मार्फत मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पाठविणेसाठी देणेत आले. 

          श्रीमती सोनियांजी गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्‍या युपीए  सरकारने स्‍थानिक स्‍वराज संस्‍था मध्‍ये महिलांना 50 आरक्षण देणेचा निर्णय घेतला. 2014 च्‍या लोकसभेच्‍या सार्वजनिक निवडणूकीमध्‍ये भारतीय जनता पक्षाच्‍या जाहिरनाम्‍यात  लोकसभा आणि विधानसभामध्‍ये महिलांना 33 आरक्षण देण्‍यासंबंधी स्‍पष्‍ट उल्‍लेख केला होता. परंतू या भाजपा सरकारला 3 वर्षे पुर्ण होवून सुध्‍दा महिला आरक्षण विधेयक मंजुर केलेले नाही.

          यावेळी सांगली शहर जिल्‍हा महिला कॉंग्रेस अध्‍यक्षा सौ. वहिदा नायकवडी,सांगली शहर जिल्‍हा महिला कॉंग्रेस उपाध्‍यक्षा सुवर्णा पाटील, माजी महापौर कांचन कांबळे, नगरसेविका वंदना कदम, शेवंता वाघमारे, अनारकली कुरणे, जहीर कुरणे आदि महिला उपस्थित होत्‍या.  

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here