जतेत स्वस्त धान्याचाही दुष्काळ .! सुस्त पुरवठाविभाच्या आर्शिवादाने ; स्वस्त धान्य दुकानदाराची मनमानी : दोन- दोन महिने धान्यच नाही

0
25

 जतेत स्वस्त धान्याचाही दुष्काळ .!

सुस्त पुरवठाविभाच्या आर्शिवादाने ; स्वस्त धान्य दुकानदाराची मनमानी : दोन- दोन महिने धान्यच नाही

Image result for स्वस्त धान्य दुकान

जत– विशेष प्रतिनिधी  : जत तालूक्यातील अनेक गावात दोन- दोन महिने स्वस्त धान्य मिळत नाही . तिसऱ्या महिन्यात येणारे धान्य देताना पाठीमागील धान्ये दिले जात नाही . पुरवठा विभागाच्या अर्थपुर्ण सहयोगाने  जतेत स्वस्त धान्याचाही दुष्काळ पडल्याचे चित्र आहे. याबाबत जिल्हाआधिकाऱ्यानी गोपनीय तपासणी करून माल महिना टू महिना देण्याबाबत कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थाची आहे .
जत तालूक्यातील जवळपास सर्वच स्वस्त धान्य दुकानदार कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी बांधिल आहेत. अशा रेशन दुकानदाराची गावात दहशत आहे.त्यामुळे सामान्य जनता मुगिळून गप्प बसते याचाच फायदा असे दुकानदार उचलत आहेत . पुरवठा विभागाच्या आर्शिवादाने दोन- दोन महिन्याचा माल काळ्याबाजाराने विकला जात आहे. शासनाच्या अशा योजनेचा अनेक कुंटुबाच्या उपासमारीने शासनाचा उद्देश असफल होतानाचे चित्र आहे . अनेक बेरोजगार कुंटुबाची पोटाची खळगी भरण्यासाठी अशी स्वस्त धान्य दुकाने मोठा आधार आहेत.दुष्काळी परिस्थिती असतानाही अनेक गावातील ग्रामस्थांना गत दोन महिन्यांपासून स्वस्त धान्य मिळात नसल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे नाईलाज म्हणून नागरिकांना खुल्या बाजारातून महागडे धान्य विकत घ्यावे लागत आहे. याबाबत अनेक गावातील लेखी तक्रारी तालूका पुरवठा विभागाकडे येतात पंरतू धान्य दुकानदाराशी अर्थपुर्ण तडजोडी असल्याने त्या परस्पर मिटवून अशा एकाद्या तक्रारदाराची मागणी मान्य करून आवाज दाबला जात आहे .असे स्वस्त धान्य मिळत नसल्याने अनेक कुंटुबावर उपासमारीची वेळ आल्याचेही अनेक गावात चित्र आहे. अनेक योजनाची योजनेनुसार धान्ये मिळत नाहीत. वरून येणाऱ्या योजनेनुसार पुरवठा होत नाही त्याही अनेक किलो गाळा मारला जातात. अनेक स्वस्त धान्य दुकानदार बिलबुक वापरत नाहीत. धान्य घेतल्यावर अनेक दुकानात बीलेही दिले जात नाही. महिन्यातील अर्धे दिवस दुकान बंद असते. असे काळाबाजार केलेल धान्य खुल्या बाजार विक्री साठी येते . त्याचाही तपास होत नाही जेथे शासन स्वस्त दरात धान्य देते तेथे काळाबाजार करून तसे धाऩ्य खुल्या बाजारातून महागड्या दराने तेच धान्य लाभार्थी ग्रामस्थाना घ्यावे लागत आहे हे विशेष .अशा स्वस्त धान्य दुकानदाराची जर समजा एकाद्या सामान्य ग्रामस्थाने तक्रार केली तर असे मगरूर धान्य दुकानदार दमबाजी ,शिवीगाळ करतात, काही वेळा तर अशा तक्रारीदारावर जीवघेणी हल्ला झाल्याची प्रकरणे आहेत. शासनाकडून हक्काचे धान्य आले नाही, अशी खोटी माहिती दुकानदार देतात. निवेदन देऊनही अधिकारी कारवाई करीत नाही. यामुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.शासनाच्या मानकाप्रमाणे धान्य वाटप गरजचे असतानाही मृत लोकांचे धान्य उचलणे , दोनदोन महिने धान्य आले नाही म्हणून धान्य उचलूनही ग्रामस्थाना धान्य दिले जात नाही . अनेक दुकानदाराकडून दोन महिन्यांत धान्य दिल्याची कुठलीही नोंदीच नसल्याचेही ग्रामस्थ सांगतात . बरेच दुकानदार धान्य देण्यास टाळाटाळच करीत असल्याने ग्रामस्थही त्रस्त आहेत.अशा अनेक दुकानदारावर तक्रारी असूनही त्याच्यावर दिसण्यायोग्य कोणतीही कारवाई केली जात नाही , परिणामी असे प्रकार वाढतच आहेत.

चौकट : १
तालूका पुरवठा विभागाचा मनमानी कारभार सुरू आहे . ते धान्य दुकानदार कोठे धान्य विकतात यांची चौकशीच करत नाहीत . मात्र धान्य घेतानाच पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याना चारअंकी नियमबाह्य नोटाचा पुरवठा करावा लागतो .नाहीतर असा पुरवठा न करणाऱ्या दुकानदाराचा धान्य पुरवठा विविध कारणे काढून बंद केला जात असल्याचे काही धान्य दुकानदार खाजगीत सांगतात .

२)

अनेक गावातील दुकानदार एकाद्या कुटुंबातील मयत व्यक्ती असतानाही ते नाव कमी न करताच वर्षान् वर्ष  धान्याची उचल दाखवित असल्याचे काही ग्रामस्थाच्या तक्रारी आहेत. पंरतू त्याउलट एकादे नाव वाढले तर अशा कुटुंबाना वर्षभर नाव आले नाही म्हणून धान्य देण्यास टाळाटाळ केली जाते याचीही चौकशी होणे गरजेचे आहे .

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here