वन विभागाच्या आर्शिवादाने वृक्षतोड वाढली .! निसर्गाचा समतोल बिघडला; शेतकऱ्याकडूनच वृक्षाची कत्तल .!

0

वन विभागाच्या आर्शिवादाने वृक्षतोड वाढली .!
निसर्गाचा समतोल बिघडला; शेतकऱ्याकडूनच वृक्षाची कत्तल .!

Image result for वृक्ष तोड

जत -विशेष प्रतिनिधी: एकेकाळी जत तालूक्यातील दाट झाडीने व्यापलेल्या आणि प्राणी संपदा असलेल्या विविध प्रकारच्या वृक्षांनी बहरलेली राने वने, शेतातील वृक्षसंपदा, जंगले उजाड झालेली आहेत.वेळीच संबधित विभागाकडून उपाययोजना न झाल्यास वृक्ष तोडीने उजाड व बोडका झालेला परिसर पहावा लागेल अशी सध्याची परिस्थिती आहे. 

शेतकर्‍यांच्या शेतातही मोठय़ा प्रमाणात विविध प्रकारची मौल्यवान जातीची झाडे होती.मात्र सतत होणार्‍या दुष्काळामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आणि कुटुंबाचा निर्वाह चालवण्यासाठी लाकूड कंत्राटदारांना शेतात असलेली झाडे विकू लागला. स्वत:च्या आर्थिक दारिद्रय़ाची झळ कमी करण्यासाठी शेतकर्‍यांनी मोठय़ा प्रमाणात झाडे कापून विकली. आतातर सर्रास शेतातील झाडे लाकूड कंत्राटदारांना विकून ती कापली जात आहेत. त्यामुळे एकेकाळी हिरवीगार दिसणारी शेती आज वृक्षांविना उजाड होताना तालूक्यात चित्र आहे. 

अन्न, निवारा व वस्त्रांसोबत मानवासह प्राणीमात्रांना जगण्यासाठी शुध्द वातावरणाची गरज आहे. शुध्द वातावरण निर्मिती वृक्षांमुळेच होते. शुध्द वातावरण निर्माण करून देणार्‍या मूळ स्त्रोतावरच मानवाने घाला घातल्याने त्याचा परिणाम मानवासह पशुपक्ष्यांवरही झाला आहे. उरलेसुरले शेतातील वृक्ष स्वार्थासाठी नष्ट केले जात असताना संबधित वन विभागाकडून  कोणतीच ठोस उपाययोजना केली जात नाही. त्याच्यात व वृक्षतोड कंत्राटदारात मोठा आर्थिक देवघेवीने वृक्षतोड दिवस न दिवस वाढतच आहे . काही शेतात अल्पशा प्रमाणात वृक्ष उरले आहेत. त्यांनाही वाचविण्याचे प्रयत्न होत नाहीत. वृक्षतोडीने  होणाऱ्या निसर्गाच्या ऱ्हासाबाबत शेतकऱ्यात जागृत्ती
संबधित विभागाकडून होणे आता कळीचे बनले आहे
अन्यथा वृक्षाविना उजाड व बोडका झालेला परिसर बघण्याचे नशिबी येऊ शकेल. त्यावेळी पाऊसचेही प्रमाण कमी होईल व निसर्गावर प्रंचड परिणाम होऊन पुर्णत: समतोल बिघडल्याचे पहावे लागेल त्यावर शासनाच्या उपाय योजना किंवा शेतकऱ्याच्या उपाययोजनाचाही काही उपयोग होणार नाही म्हणून वेळ जाण्याअगोदर संबधित विभागाकडून विशेष मोहिम उघडून अशी वृक्षतोंड थाबवावी अशी मागणी आहे

Rate Card

नव्याने लावलेले वृक्ष त्वरित मोठे होत नाहीत. जनतेमध्ये नवीन झाडे लावण्याबाबत जागृती नाही परिणामी नविन वृक्ष लागवडीचा अभाव आहे. लावलेली झाडे जगविण्याचाही प्रयत्न होत नाहीत. या कारणामुळेच निसर्गाचा समतोल बिघडल्याने यातूनच ग्लोबल वार्मिगची समस्या निर्माण झाली आहे. त्याचा फटका आज अख्या जगाला जाणवत असून मानवासमक्ष विविध गंभीर स्वरूपाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. 

वातावरणात शुध्द हवा मिळत नसल्यामुळे निसर्गाच्या सौंदर्यात भर पाडण्यार्‍या पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. यावर ठोस उपाययोजना करण्यात आली नाही तर येत्या भविष्यकाळात पक्ष्यांच्या जातीचे अस्तित्व नाहिसे झाल्याशिवाय राहणार नाही. मानवी जीवनामध्ये वृक्षांचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यातूनच मानवाला इंधन, औषधी, फळ, फूल तसेच चांगले जीवनसुद्धा मिळते. हे सर्व बघण्याची जवाबदारी शासनाच्या वनविभागाकडे असते. परंतु वनविभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे वरकमाईच्या नादात लाकूड कंत्राददारांवर मेहरनजर राखण्यात येत असल्यामुळे वृक्षांची मोठय़ा प्रमाणात कत्तल होत आहे. त्यामुळे वृक्ष हाच आधार असलेले पक्षी सहजच लुप्त होत आहेत व मानवावरही मोठे परिणाम होत आहेत
पूर्वी लोकसंख्या फार कमी होती. गावात शेतात मोठमोठी वृक्ष होती. पूर्वीलोक वृक्षपूजन करीत होते.जागोजागी विविध वृक्षांची लागवड होत होती. याच झाडांवर पक्ष्यांचे वास्तव्य असायचे. मात्र सद्यस्थितीत वृक्षांची संख्या कमी होत असून सिमेंट काँक्रिटची जंगले उभी होऊ लागली आहेत. या सिमेंटच्या जंगलाना सुशोभीत करण्यासाठी वृक्षांची मोठय़ा प्रमाणात अमानूषपणे कत्तल केली जात आहे. परिणामी पक्ष्यांचे निवारे नष्ट झाले. जगण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण होत नसल्यामुळे पक्ष्यांच्या जाती नाहीशा होऊ लागल्या. 

विविध सामाजिक संस्था, राजकीय नेते, शासन-प्रशासनामार्फत गाजावाजा करून  शासनाच्या विविध योजनेतून वृक्षारोपण केले जाते.नंतर त्याकडे कधीच ढुंकूनही पाहण्यात येत नाही.परिणामी वृक्ष लागवडीनंतर त्या वृक्षाकडे बघितलेच जात नाही लावलेली वृक्षे महिन्याभरात वाळून गेली आहेत    सध्या लाकडी वस्तू न वापरण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. मात्र त्या पर्यांयाना अग्रक्रम न देता आज सर्वत्र फर्निचर मार्ट गलोगल्लीत पहावयास मिळत आहे.शेतातील वृक्षांची कत्तल सर्रास होत असून वाहतूकही राजरोसपणे सुरू आहे. मग वृक्ष कत्तल करून लाकडांची वाहतूक कोणत्या आधारे केली जात आहे.गावोगावात मोकळ्या जागेत हजारो मीटर लाकूड कापून संचित केले जात आहे.त्याचेच दुष्परिण शेवटी मानवालाच भोगावे लागणार आहेत हे मात्र नक्की.!

चौकट
जत तालूक्यातील अनेक गावात शासनाच्या रोजगार हमी योजनेतून करोडो रूपये निधी उचलून लाखो झाडे लावली आहेत . काही बोटावर मोजण्याएवढे गावे सोडून इतर गावात लावलेले वृक्षाच्या वाळलेल्या काटक्याही पहावयास मिळत नाहीत. मग सांगा नेमका निधी कुणी उचलला आणि काय उद्देश सफल झाला.जत पंचायत समितीच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून झाडे लावण्यासाठी आलेल्या सर्व योजनाची चौकशी करून जेथे सध्या झाडे नाहीत अशा गावातील संबधिताकडून निधी उचलूनही झाडे लावून जगविली नसतीलतर त्याच्याकडून तो निधी वसूल करून परत वृक्ष लागवड करावी अशी मागणी जागृत नागरिकातून होत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.